शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

एलईडी प्रकल्पाचा मुदतवाढीचा फैसला अंधातरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:19 IST

सांगली : महापालिकेच्या ६० कोटी रुपयांच्या एलईडी प्रकल्पासाठी एजन्सी नियुक्तीसाठी शासनाने दिलेली मुदत शुक्रवारी संपली. या प्रकल्पाच्या निविदेला मान्यतेचा ...

सांगली : महापालिकेच्या ६० कोटी रुपयांच्या एलईडी प्रकल्पासाठी एजन्सी नियुक्तीसाठी शासनाने दिलेली मुदत शुक्रवारी संपली. या प्रकल्पाच्या निविदेला मान्यतेचा विषय स्थायी समितीकडे प्रलंबित आहे. तर ई-स्मार्ट कंपनीने निविदेबाबत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. स्थायी समिती व उच्च न्यायालयाच्या निर्णयावर प्रकल्पाच्या मुदतवाढीचे भवितव्य अवलंबून आहे. प्रशासनानेही मुदतवाढीबाबत शासनाकडे प्रस्ताव पाठविण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.

महापालिकेच्या एलईडी प्रकल्पासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यास शासनाने डिसेंबर २०२० मध्ये मंजुरी दिली. सहा महिन्यात प्रकल्पासाठी एजन्सी नियुक्त करण्याचेही आदेश दिले. कोरोनामुळे निविदा प्रक्रियेला उशीर झाल्याने शासनाकडून एक महिन्याची मुदतवाढही देण्यात आली. ही मुदत ९ जुलै रोजी संपली. या काला‌वधीत एप्रिल महिन्यात महापालिकेने एलईडी प्रकल्पासाठी निविदा मागविल्या. तीनदा मुदतवाढ देऊनही दोनच निविदा आल्या. त्यापैकी ई स्मार्ट मुंबई या कंपनीला अपात्र ठरविण्यात आले. तर पुण्याच्या समुद्रा कंपनीची निविदा पात्र ठरली. निविदेबाबत ई स्मार्ट कंपनीने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यावर शुक्रवारी सुनावणी होणार होती. पण ती झाली नाही.

दरम्यान, प्रशासनाने समुद्रा कंपनीच्या निविदेला मान्यता देण्याचा विषय स्थायी समितीकडे पाठविला आहे. गेल्या आठवड्यात स्थायी समितीची सभा झाली नाही. त्यामुळे निविदा मंजुरीवरील निर्णय प्रलंबित आहे. अशातच शासनाने दिलेली मुदतही संपल्याने प्रशासनासमोर पेच निर्माण झाला आहे.

चौकट

मुदतवाढीसाठी शासनाकडे प्रस्ताव : आयुक्त

स्थायी समितीत निविदेबाबत निर्णय झालेला नाही. त्यात उच्च न्यायालयाचाही निर्णय आलेला नाही. या दोन्हींच्या निर्णयावर प्रशासनाचे लक्ष आहे. स्थायी समितीने प्रकल्पाबाबत सकारात्मक अथवा नकारात्मक निर्णय घेतला तर शासनाकडे मार्गदर्शन मागविणार आहोत. स्थायीच्या निर्णयानंतरच मुदतवाढीचा प्रस्ताव पाठवू. तोपर्यंत उच्च न्यायालयाच्या निर्णय येईल, असे आयुक्त नितीन कापडणीस यांनी सांगितले.