शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

‘वसंतदादा’च्या कर्ज प्रकरणावरून संचालकांत वाद

By admin | Updated: October 30, 2015 23:10 IST

जिल्हा मध्यवर्ती बँक : ९ कोटी ८६ लाखाचे कर्ज मंजूर; कारभारात समीकरणे बदलली

सांगली : वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या कर्ज प्रकरणावरून सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या गुरुवारी झालेल्या कार्यकारी समितीच्या सभेत संचालकांमध्ये वाद झाला. कारखाना एनपीएमध्ये असल्याने त्यास कर्जपुरवठा करू नये, अशी सूचना काही संचालकांनी केल्यानंतर हा वाद निर्माण झाला. एफआरपीसाठी शासनाच्या थकहमीवर ९ कोटी ८६ लाखाचे कर्ज मंजूर करण्यात आले. जिल्हा बँकेच्या कार्यकारी समिती सभेत गुरुवारी वसंतदादा कारखान्याचे कर्ज प्रकरण गाजले. चालू गळीत हंगामासाठी नक्त मूल्य उणे (एनपीए) असलेल्या कारखान्यांना कर्ज देण्यास राज्य व जिल्हा बँकांनी नकार दिला होता. त्यामुळे या कारखान्यांना सरकारकडून १२७ कोटी रुपयांची पूर्वहंगामी थकहमी देण्याचा निर्णय नुकताच घेण्यात आला आहे. त्यानुसार वसंतदादा कारखान्याने ९ कोटी ८६ लाखाचा कर्ज प्रस्ताव बँकेला दिला होता. जुनी थकबाकी, एनपीए या गोष्टींवरून वसंतदादा कारखान्यास कर्ज देता येणार नाही, असे मत अध्यक्षांसह काही संचालकांनी मांडले. यामध्ये कोणतेही व्यक्तिगत स्वरूपाचे कारण नसून, बँकेचे हित व नियम पाळणे गरजेचे असल्याने या गोष्टीला विरोध असल्याचे काही संचालकांनी सांगितले. वसंतदादा साखर कारखान्यास कर्ज मंजूर करण्यास एका गटाचा विरोध, तर दुसऱ्या गटाचे समर्थन होते. त्यामुळे संचालकांत यावरून वाद झाला. प्रा. सिकंदर जमादार यांच्यासह काही संचालकांनी आक्रमक भूमिका स्वीकारली. हे प्रकरण कायदेशीरच असून, अध्यक्षांसह ज्यांना हा निर्णय वादग्रस्त वाटत असेल, त्यांनी सभेला गैरहजर राहावे. आम्ही सभा चालवून त्यामध्ये याचा निर्णय घेऊ, अशी भूमिका त्यांनी मांडल्याची चर्चा होती. शेवटी सामंजस्याने या कर्जाला मंजुरी देण्यात आली. (प्रतिनिधी)वाद कशामुळे?वास्तविक कारखान्याच्या कर्ज प्रकरणाला सव्वाचार कोटीच्या घोटाळ्याचे प्रकरण चिकटले आहे. वसंतदादा कारखान्याला बँक गॅरंटीपोटी दिलेले २ कोटी १६ लाख रुपये तत्कालीन संचालकांना अडचणीचे ठरले आहे. या गोष्टीचा ठपका असलेल्या लोकांमध्ये काही विद्यमान संचालकही आहेत. त्यामुळे त्यांनी कारखाना अध्यक्ष व बँकेचे संचालक विशाल पाटील यांच्याकडे २ कोटी १६ लाख रुपये भरण्याची मागणी केली होती. ही रक्कम भरण्याच्या तयारीपोटी ९ कोटी ८६ लाखाचे कर्ज मंजूर करण्याची तडजोड झाल्याची चर्चा बँकेत रंगली होती. त्यामुळे या कर्ज प्रकरणाचे काही संचालकांनी ताकदीने समर्थन केले.कायद्यावर बोटजिल्हा बँकेच्या यापूर्वीच्या संचालक मंडळाचे अनेक निर्णय, कर्ज प्रकरणांची मंजुरी वादग्रस्त ठरली होती. याप्रकरणी काही संचालकांवर आरोपपत्रही दाखल झाले आहे. त्यामुळे अध्यक्षांसह नव्या संचालकांपैकी अनेकजण अडचणीची कर्ज प्रकरणे मंजूर करण्याच्या विरोधात आहेत. कायद्यानुसार काटेकोरपणे कर्ज प्रकरणे हाताळण्याची त्यांची भूमिका आहे. तरीही दबाव वाढत असल्याचे चित्र आहे. पैसे खात्यावर...कारखान्याला मंजूर केलेले कर्ज हे एफआरपीसाठी दिलेले आहे. त्यामुळे ते थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे.