शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

‘खोकी हटाव’च्या धक्क्याने वृद्धेचा मृत्यू

By admin | Updated: January 20, 2015 00:22 IST

आष्ट्यातील घटना : अधिकाऱ्यांसोबतची बैठक निष्फळ

आष्टा : अतिक्रमण हटविण्याच्या मोहिमेंतर्गत सार्वजनिक बांधकाम विभागाने येत्या बुधवारपर्यंत खोकी काढण्याचा इशारा दिल्यानंतर खोके जाण्याचा धक्का सहन न झाल्याने येथील लक्ष्मीबाई बाळासाहेब यादव (वय ६५) या वृद्धेचा आज, सोमवारी मृत्यू झाला. त्यांच्या मुलाचे केशकर्तनालयाचे खोके आहे. दरम्यान, आधी पुनर्वसन करा, मग खोकी काढा, अशी मागणी खोकीधारकांनी केली. यासंदर्भात अधिकाऱ्यांसोबत बैठकही झाली. मात्र अधिकारी खोकी काढण्यावर ठाम असल्याने हा प्रश्न चिघळण्याची चिन्हे आहेत. आष्टा येथे सांगली रस्त्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेवर खोकीधारकांनी अतिक्रमण केले आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने येत्या बुधवारी ही खोकी काढण्यात येणार असल्याची नोटीस अधिकाऱ्यांनी १२७ खोकीधारकांना दिली आहे. यामुळे खोकीधारकांनी आज बांधकाम विभागाच्या कार्यालयावर मोर्चा काढला. खोकी काढू नयेत, अन्यथा आमचे संसार उद्ध्वस्त होतील, अशी विनंती त्यांनी केली.नगराध्यक्षा मंगलादेवी शिंदे यांनी याप्रश्नी बांधकाम विभागाचे अभियंता बी. एल. हजारे, सहायक अभियंता एम. एम. गाताडे, मुख्याधिकारी अजित राऊत यांच्याशी चर्चा केली व खोकी काढू नयेत, असे निवेदन दिले. मात्र अधिकाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे पालन करावे लागणार आहे. कोठेही संघर्षाची स्थिती निर्माण होऊ नये, यासाठी खोकीधारकांनी उद्यापर्यंत खोकी काढून घ्यावीत, असा सल्ला अधिकाऱ्यांनी दिला. या चर्चेतून कोणताही मार्ग न निघाला नाही. त्यामुळे आता खोकी निघणारच, हा धक्का सहन न झाल्याने आज दुपारी लक्ष्मीबाई यादव या महिलेचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. ओ. के. हेअर ड्रेसर्सचे मालक दिलीप यादव यांच्या त्या मातोश्री होत. या घटनेमुळे खोकीधारक संतप्त बनले. त्यांनी व्यवसाय बंद ठेवून याचा निषेध केला.पुनर्वसन करावे : शिंदेनगराध्यक्षा शिंदे म्हणाल्या की, खोकीधारकांची खोकी काढू नयेत, यासाठी आमचे प्रयत्न राहतील. या खोकीधारकांचे पशुवैद्यकीय रुग्णालय, एसटी बसस्थानक या जागेसह अन्य ठिकाणी पुनर्वसन करावे आणि मगच त्यांना हटवावे, अशी मागणी अधिकाऱ्यांकडे केली आहे. यावर सकारात्मक निर्णय होईल, अशी अपेक्षा आहे. सांगलीत आज बैठकपंचायत समितीचे माजी उपसभापती वैभव शिंदे, खोकीधारक सुनील माने, शैलेश सावंत, संजय सावळवाडे, समीर लतीफ, अनिल भोसले, शीतल वग्याणी, राकेश सावळवाडे, विजय चव्हाण यांनी जिल्हाधिकारी कुशवाह यांची भेट घेऊन खोकीधारकांचे पुनर्वसन करूनच खोकी काढावीत, या मागणीचे निवेदन दिले. यावर त्यांनी चर्चा करण्यासाठी उद्या, मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक बोलाविली आहे.