शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळीचा चाळीस हजार एकर द्राक्षबागांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2018 23:59 IST

तासगाव : सलग तीन दिवस पडलेला पाऊस, ढगाळ हवामान आणि दव यामुळे जिल्ह्यातील सुमारे चाळीस हजार एकरावरील द्राक्षबागांना फटका ...

तासगाव : सलग तीन दिवस पडलेला पाऊस, ढगाळ हवामान आणि दव यामुळे जिल्ह्यातील सुमारे चाळीस हजार एकरावरील द्राक्षबागांना फटका बसला आहे. आॅक्टोबरच्या पहिल्या पंधरवड्यात पीक छाटणी घेतलेल्या द्राक्षाबांगा घडकूज, दावण्याने वाया जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे सलग दुसऱ्यावर्षी द्राक्षबागायतदारांना नुकसानीचा सामना करावा लागला असून, सुमारे चार हजार कोटींचा फटका बसल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यातील विविध भागाला वादळी पावसाने झोडपले आहे. खानापूर, आटपाडी, तासगाव कवठेमहांकाळ, मिरज, पलूस तालुक्यात अनेक ठिकाणी कमी-जास्त प्रमाणात पाऊस झाला आहे. बुधवारी पाऊस झाला नसला तरी, दिवसभर ढगाळ वातावरण होते. दोन, तीन दिवसांपासून सकाळी दहापर्यंत द्राक्षबागेतील दव कायम राहिले आहे. ऐन द्राक्ष हंगामाच्या सुरुवातीलाच पावसाने हजेरी लावल्याने हा पाऊस द्राक्षबागांच्या मुळावर आला आहे. गेल्यावर्षी लवकर द्राक्षछाटण्या घेतल्या होत्या. त्यावेळी पावसामुळेच द्राक्षबागांचे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे यावर्षी बहुतांश शेतकºयांनी आॅक्टोबर महिन्यात द्राक्ष छाटणी घेतली. मात्र आता तामिळनाडूतील वादळामुळे जिल्ह्यात झालेल्या पावसाने पुन्हा मोठ्या नुकसानीचा सामना करावा लागत आहे. जिल्ह्यातील सुमारे ७० टक्के द्राक्षबागा फ्लॉवरिंग अवस्थेत आहेत. सलग तीन दिवस पडलेला पाऊस, ढगाळ हवामान आणि दव यामुळे बहुतांश बागांतून घडकूज, मणीगळ आणि दावण्या रोग दिसून येत आहे. त्यामुळे या द्राक्षबागा उद्ध्वस्त होणार आहेत. नुकसानीचे नेमके चित्र स्पष्ट झाले नसले तरी, आॅक्टोबरच्या पहिल्या पंधरवड्यात पीक छाटणी झालेल्या द्राक्षबागांना मोठा फटका बसणार असून, सुमारे ४० हजार एकर द्राक्षबागांना अंदाजे चार हजार कोटींच्या नुकसानीचा सामना करावा लागणार आहे.सलग दुसºया वर्षी निसर्गाचा प्रकोपआगाप छाटणी घेतल्यानंतर चांगला दर मिळतो, या अपेक्षेतून बहुतांश द्राक्षबागायतदारांनी सप्टेंबर महिन्यात पीक छाटणी घेतली होती; मात्र गेल्यावर्षीच्या अवकाळी पावसामुळे आगाप छाटण्या घेतलेल्या सर्व द्राक्षबागांचा हंगाम वाया गेला होता. त्यामुळे यावर्षी बहुतांश द्राक्षबागायतदारांनी आॅक्टोबर महिन्यात पीक छाटणी घेतली. मात्र याहीवर्षी पावसामुळे द्राक्षबागांना फटका बसला. त्यामुळे द्राक्षबागायतदार हवालदिल झाले आहेत.