शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

मृतदेह विटंबना; आंबोळेंसह दोघेजण निलंबित

By admin | Updated: November 11, 2014 00:02 IST

आयुक्तांची कारवाई : वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक, मुकादमाची वेतनवाढ रोखली

सांगली : मिरजेत झालेल्या बेवारस मृतदेहांच्या विटंबनेप्रकरणी आज, बुधवारी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सुनील आंबोळे व सफाई कर्मचारी गोविंद मद्रासी या दोघांना आयुक्त अजिज कारचे यांनी निलंबित केले, तर वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक आर. के. यादव व मुकादम मिलिंद शिंदे यांची वेतनवाढ रोखण्यात आली. या चौघांवर कामात निष्काळजीपणा केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. मृतदेह विल्हेवाट लावण्यात पोलीस व सिव्हिल प्रशासनावरही ठपका ठेवला असून, त्याचा अहवाल संबंधित विभागाकडे पाठविण्यात आला आहे. सांगलीतील दोन बेवारस मृतदेह पोलिसांनी महापालिका आरोग्य विभागाच्या मजुरांच्या ताब्यात अंत्यसंस्कारासाठी दिले होते. उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह कापडात गुंडाळून दिले जातात; मात्र बेवारस दोन्ही मृतदेह नग्नावस्थेत, शववाहिकेऐवजी कचरा उचलणाऱ्या गाडीतील कंटेनरमधून मिरजेतील पंढरपूर रोड स्मशानभूमीत आणण्यात आले. बेवारस मृतदेहांची विटंबना होते, याप्रकरणी महापालिकेवर टीकेची झोड उठल्यानंतर आयुक्तांनी प्रभारी उपायुक्त सुनील नाईक यांच्या अध्यक्षतेखालील समितीत सहाय्यक आयुक्त टीना गवळी, आरोग्य अधिकारी डॉ. सुनील आंबोळे, डॉ. रवींद्र ताटे, वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक किशोर गोंधळेकर या पाच सदस्यांची चौकशी समिती नियुक्त केली होती. या समितीने सोमवारी सायंकाळी आपला सीलबंद अहवाल आयुक्तांना सादर केला होता. या अहवालात आरोग्य विभागाकडील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कर्तव्यात कसूर केली असून, कामाकडे अक्षम्य दुर्लक्ष केले. त्यांच्या निष्काळजीपणामुळे महापालिकेची बदनामी झाल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. त्याची दखल घेत आयुक्त कारचे यांनी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सुनील आंबोळे व मृतदेहांची विल्हेवाट लावणारा सफाई कामगार गोविंद मद्रासी या दोघांना निलंबित केले. तरसेच वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक आर. के. यादव यांच्या दोन वेतनवाढी, तर मुकादम मिलिंद शिंदे यांची एक वेतनवाढ रोखण्याचे आदेश दिले आहेत. (प्रतिनिधी)संघटना आक्रमकमृतदेहाची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी महापालिकेची असली तरी, त्याची सर्व पूर्तता पोलीस व सिव्हिल प्रशासनाने करावयाची आहे. या प्रकरणात सिव्हिलने विवस्त्र मृतदेह पालिकेच्या ताब्यात दिले. पोलिसांनी पंचनामा केला नाही, की दफनावेळीही ते हजर नव्हते. त्यामुळे केवळ पालिका कर्मचारी दोषी आहेत असे नव्हे, तर जबाबदारी पोलीस व सिव्हिलची आहे. त्यासाठी आता शुक्रवारी आयुक्त अजिज कारचे यांची भेट घेऊन त्यांना जाब विचारणार असल्याचे कर्मचारी संघटनेचे नेते दिलीप शिंदे यांनी सांगितले. सांगली, मिरज पोलिसांतील फरकबेवारस मृतदेहाबाबत सांगली व मिरज पोलिसांतील फरकही अहवालात स्पष्ट करण्यात आला आहे. मिरजेतील पोलीस बेवारस मृतदेहाची विल्हेवाट लावताना महापालिकेला पत्र देऊन शववाहिकेची मागणी करतात. मृतदेहाचे दफन करेपर्यंत पोलीस कर्मचारी तेथे हजर असतो. सांगली शहर पोलीस ठाण्यातील कनिष्ठ दर्जाच्या कर्मचाऱ्यांकडून पालिकेला पत्र दिले जाते. त्यात पालिकेने मृतदेहाची विल्हेवाट लावा, असे सांगून आपली जबाबदारी झटकली जात असल्याचे स्पष्ट केल्याचे सूत्रांनी सांगितले. पालिका कर्मचाऱ्यांची टोलवाटोलवीपोलिसांचे पत्र आयुक्तांनी वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठविले. वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनील आंबोळे यांनी आर. के यादव यांना दूरध्वनीवरून दोन मृतदेहांची विल्हेवाट लावण्यास सांगितले. यादव यांनी मुकादमाला, तर मुकादमाने सफाई कर्मचाऱ्याला दूरध्वनीवरूनच हा आदेश दिल्याचे अहवालात उघड झाल्याने या चौघांवर कारवाई करण्यात आली आहे.