शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
2
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
3
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
4
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
5
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
6
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
7
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
8
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
9
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
10
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
12
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
13
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
14
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
15
पावसाळी शेडसाठी जैन मंदिर हायकोर्टात; ट्रस्टला महापालिकेकडे निवेदन देण्याचे निर्देश
16
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
17
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा
18
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
19
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
20
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द

साखळीचोरांची ‘डीबी’कडून पाठराखण!

By admin | Updated: March 31, 2015 00:28 IST

अटक आणि कोठडीही : घडलेल्या गुन्ह्यांचे काय? तपास ठप्पच

सांगली : विविध गुन्ह्यांचा तपास गुंडाळण्यात शहर पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण पथकाचा (डीबी) हातखंडाच बनला असल्याचे पाहावयास मिळत आहे. महिलांच्या गळ्यातील दागिने हिसडा मारुन लंपास करणाऱ्या साखळीचोरांना पकडले. पण त्याचा तपास पुढे सरकलाच नाही. एकही गुन्हा उघडकीस न आल्याने तपासाबद्दल संशय व्यक्त केला जात आहे. प्रसारमाध्यमांना याची माहिती मिळू नये, यासाठी पथकाने पुरेपूर दक्षता घेऊन, साखळीचोरांची त्यांनी एकप्रकारे पाठराखणच केली आहे.शशिकांत पावसकर या तरुणाच्या खुनाचा तपास गुंडाळला. मुख्य बसस्थानक व आठवडा बाजारात झालेल्या चोऱ्यांची प्रकरणे दाखल न करता परस्पर मिटविली. जुगार अड्ड्यांवर छापे टाकले जातात; मात्र कागदोपत्री कुठेही त्याची नोंद केली नसल्याची शहरात चर्चा सुरु आहे. जिल्हा पोलीसप्रमुख दिलीप सावंत यांनी डीबी पथकाच्या या अनागोंदी कारभाराची गंभीर दखल घेऊन चार दिवसांपूर्वी चांगलीच खरडपट्टी केली होती. त्यानंतर बसस्थानकावरील चोरी व पेठभागातील एका घरफोडीचा छडा लावल्याचा आटापिटा करुन पोलीसप्रमुखांची शाबासकी मिळविण्याचा प्रयत्न पथकाने केला. घरफोडी व चोरीचा गुन्हा दाखल न करता केवळ कच्ची नोंद केली जाते. तपास करुन गुन्हेगारांना पकडले जाते. पण ही कारवाई रेकॉर्डवर न घेण्याचे कारण काय? अशी शहरात उलट-सुलट चर्चा सुरु आहे. गुन्हेगारांना पकडल्याची केवळ कागदोपत्री नोंद केली जात असली तरी, तपासाचे काय? ज्या महिलांचे दागिने गेले आहेत, त्यांना ते परत मिळवून देण्यासाठी ते का प्रयत्न करीत नाहीत. महिलांच्या गळ्यातील दागिने लंपास केल्याचे गुन्हे शहरात घडले आहेत. हे गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांना गेल्या आठवड्यात पकडले होते. त्यांना अटक केली, न्यायालयाकडून पोलीस कोठडीही घेतली होती. पण त्यांच्याकडून किती गुन्हे उघडकीस आले, दागिने जप्त केले का, याची माहिती घेण्याचा प्रयत्न केला. तथापि पथकाने एकमेकांची नावे सांगून माहिती देण्यास नकार दिला. हे गुन्हेगार आज, सोमवारी न्यायालयीन कोठडीत गेले. (प्रतिनिधी)‘डीबी’कडे चौकशी करा...गुन्हेगारांची नावे काय आहेत, याची माहिती घेण्यासाठी पोलीस ठाण्यात दूरध्वनीवरुन संपर्क साधला. तथापि ‘आमच्याकडे काहीच नाही, तुम्ही डीबी पथकात चौकशी करा’, असे ठाणे अंमलदारांनी सांगितले. डीबी पथक म्हणेल ती पूर्वदिशा, असा सध्या पोलीस ठाण्याचा कारभार सुरू आहे.