शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

दारुबंदी डमी????????????????

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:53 IST

सांगली : जिल्ह्यात गावात १६८ गावांत शंभर टक्के दारुबंदी आहे., पण सध्या नावापुरतीच उरल्याचे दिसत आहे. गावकऱ्यांनी आणि ...

सांगली : जिल्ह्यात गावात १६८ गावांत शंभर टक्के दारुबंदी आहे., पण सध्या नावापुरतीच उरल्याचे दिसत आहे. गावकऱ्यांनी आणि विशेषत: महिलांनी मोठी जनआंदोलने उभी करुन बाटली आडवी केली, पण ठोस कारवाई अभावी ती पुन्हापुन्हा उभी राहत असल्याचे चित्र आहे.

सोनी, बिसूर, कवठेपिरान अशा काही गावांत बाटली आडवी करण्यासाठीची आंदोलने मोठ्या चर्चेची ठरली. महिलांनी दारुविरोधात आघाडी उघडून दुकानांना टाळे ठोकायला भाग पाडले. पण याच गावांत आता चोरटी विक्री पुन्हा जोमात आहे. सोनीमध्ये दुकान नाही, पण शेजारच्या मणेराजुरीतून दारु आणून विकली जाते. ७० रुपयांची बाटली शंभरला मिळते. काही पानपट्ट्या खास दारुसाठी प्रसिद्ध आहेत. शौकीनांना त्या नेमक्या माहिती आहेत. गावाभोवताली काही अड्ड्यांवरही रात्री उशिरापर्यंत मैफली जमतात. तक्रार येताच किंवा माहिती मिळताच पोलीस कारवाई करतात, पण पुन्हा येरे माझ्या मागल्या सुरु होते. दारुविरोधी महिलांचा विक्रेत्यांवर अद्याप बराच वचक आहे हीच काय ती दिलाशाची बाब आहे.

पुन्हा आंदोलन छेडणार

कुमठे (ता. तासगाव ) येथे आम्ही दारुविरोधात जोरदार आंदोलन केले. महिलांच्या उठावाने बंदोबस्त झाला. दारु दुकान सुरु झाले नाही. गावात सध्या सरकारमान्य विक्री नाही, पण अवैध विक्रीमुळे महिला त्रस्त आहेत. चोरुन दारु आणली जाते. याच्या कायम बंदोबस्तासाठी पुन्हा आघाडी उघडणार आहोत.

- डॉ. भारती पाटील, दारुविरोधी आंदोलक, कुमठे

बाहेरुन आणून विक्री

सोनीमध्ये २०१० मध्ये महिलांनी उठाव केला. बाटली आडवी केली. पण शंभर टक्के बंदोबस्त झाला नाही. सध्या चोरुन दारु विकली जाते. पोलीस कारवाई होते, पण नंतर विक्रेते पुन्हा अड्डा जमवतात. मणेराजुरीतून दारु आणली जाते. बंदोबस्तासाठी महिलांना निर्णायक उठाव करणार आहोत.

- चंपाताई जाधव, दारुविरोधी आंदोलक, सोनी

पोलीसांत तक्रार करणार

गावात गेल्याच आठवड्यात पोलीसांनी कारवाई केली होती. काहीजणांना ताब्यात घेतले होते. त्यांनी सुटकेनंतर पुन्हा विक्री सुरु केली आहे. गावात दुकान नाही, पण शेजारच्या गावातून आणून विकली जाते. यासंदर्भात महिलांनीही ग्रामपंचायतीकडे तक्रारी केल्या आहेत. आम्ही पोलीसांना भेटून तक्रार करणार आहोत.

-राजू माळी, सरपंच, सोनी, ता. मिरज.

-----------