शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

आष्ट्यातील मुस्लिम युवकांकडून ऐक्याचे दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:19 IST

फोटो: आष्टा येथील सामाजिक संस्थेच्यावतीने शकील मुजावर व सहकारी यांचा गौरव करण्यात आला. सुरेंद्र शिराळकर लोकमत न्यूज नेटवर्क आष्टा ...

फोटो: आष्टा येथील सामाजिक संस्थेच्यावतीने शकील मुजावर व सहकारी यांचा गौरव करण्यात आला.

सुरेंद्र शिराळकर

लोकमत न्यूज नेटवर्क

आष्टा : येथील मुस्लिम समाजातील सामाजिक कार्यकर्त्यांनी कोरोना काळात सामाजिक बांधीलकी जपली आहे. त्यांनी मुस्लिम समाजाबरोबर हिंदू समाजातील कोरोनाने मृत झालेल्या रुग्णांच्या मृतदेहावर कोणताही मोबदला न घेता अंतिम संस्कार करत माणुसकीची ज्योत तेवत ठेवली आहे.

आष्टा येथील जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचे कट्टर समर्थक शकील मुजावर यांना कोरोनाची लागण झाली. या संकटावर त्यांनी मात केली मात्र या संकटकाळात माणुसकी जिवंत ठेवण्यासाठी काय करावे याचा त्यांनी ध्यास घेतला. कोरोनाने मृत्यू पावलेल्या नागरिकांच्यावर अंतिम संस्कार करताना अडचणी निर्माण होत आहेत. हे पाहून शकील मुजावर, अझरूद्दीन मुजावर,अरिफ फकिर, कलंदर मुजावर, साजिद मुलानी, इम्रान मेहताब, इसाक मुजावर, फिरोज टेमकर यांच्यासह १४ युवकांनी रुहानिया मदरसा मस्जिद दफन कमिटी स्थापन केली. याबाबत तहसील कार्यालय व पालिकेची मान्यता घेण्यात आली. या कमिटीच्या माध्यमातून आष्टा व परिसरात कोरोनाने मृत्यू झालेल्या रुग्णांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात येत आहे. मुस्लिम समाजाबरोबर हिंदू समाजातील ही व्यक्तींवर अंतिम संस्कार करत शकील मुजावर व सहकारी यांनी सामाजिक बांधीलकी जपली आहे

चौकट :

तरुणांसाठी मार्गदर्शक

शकील मुजावर व त्यांच्या सहकाऱ्यांनी समाजातील गोरगरीब गरजूंना आजवर अनेकवेळा मदत केली आहे. त्यांना संसारोपयोगी साहित्य देतात. मात्र, त्याची कुठेही वाच्यता करत नाहीत. त्यांचे काम युवापिढीला मार्गदर्शक ठरत आहे.