शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

खानापूर तालुक्यामध्ये दुष्काळाचे उग्र रूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2019 23:47 IST

दिलीप मोहिते । लोकमत न्यूज नेटवर्क विटा : सांगली जिल्ह्याचे शेवटचे टोक असलेल्या खानापूर तालुक्यातील बाणूरगड, कुसबावडे, ताडाचीवाडी परिसरात ...

दिलीप मोहिते ।लोकमत न्यूज नेटवर्कविटा : सांगली जिल्ह्याचे शेवटचे टोक असलेल्या खानापूर तालुक्यातील बाणूरगड, कुसबावडे, ताडाचीवाडी परिसरात दुष्काळाने उग्र रूप धारण केले आहे. या गावांमधील विहिरी, कूपनलिका कोरड्या पडल्या असून दुष्काळी उपाययोजनेचा भाग म्हणून केवळ टॅँकरच्या दीड खेपा दिल्या जात आहेत. त्यामुळे दुष्काळाचा सामना करणाऱ्या ग्रामस्थांमधून प्रशासन व राज्यकर्त्यांबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे.खानापूर तालुक्याच्या पूर्व भागातील घाटमाथ्यावरील बाणूरगड हे सांगली जिल्ह्यातील शेवटचे गाव. अठरा विश्व दारिद्र्याचा सामना करावा लागत असलेल्या या गावातील लोकांवर गेल्या तीन वर्षांपासून वरूणराजाही कोपला आहे. सुमारे सोळाशे ते सतराशे लोकसंख्या असलेल्या बाणूरगड, ताडाचीवाडी व कुसबावडे परिसरात जनावरांची संख्या आठशे ते नऊशेच्या आसपास आहे. भौगोलिकदृष्ट्या अत्यंत उंचावर असलेली ही तीन गावे सध्या तरी कोणत्याच जलसिंचन योजनेच्या आराखड्यात समाविष्ट नाहीत. त्यामुळे या परिसरात शेतीसह पिण्याचा पाणीप्रश्नही गंभीर बनला आहे.गेल्या तीन वर्षांपासून पाऊस नसल्याने शेती भकास झाली आहेच, शिवाय पिण्याचा पाणी प्रश्नही सध्या मोठ्या प्रमाणात भेडसावू लागला आहे. बाणूरगड गावात चार ते पाच शिवकालीन विहिरी, तीन कूपनलिका आहेत. परंतु, त्यात चिमणीला पिण्याइतकेही पाणी नाही. प्रशासनाने टॅँकरने पाणीपुरवठा सुरू केला असला तरी, केवळ दीड खेप म्हणजे १५ हजार लिटर पाणी गावाला दिले जात आहे. टॅँकरच्या खेपा वाढविण्याची ग्रामस्थांची मागणी आजही प्रलंबित असून, त्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.प्रशासनाने जनावरांच्या चारा व पाण्याची व्यवस्था केली नाही. त्यामुळे पशुधन धोक्यात आले असून, चाºयाचा प्रश्न मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे. परिणामी, येथील लोकांवर स्थलांतराची वेळ आली आहे. बाणूरगड, ताडाचीवाडी, कुसबावडे परिसरातील भीषण दुष्काळाकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. विहिरी, कूपनलिका कोरड्या ठणठणीत पडल्याने पाण्याची व्यवस्था तातडीने करणे गरजेचे बनले आहे. पाणी व चारा न मिळाल्यास येथील लोकांवर जीवापाड जपलेली मूक जनावरे कवडीमोल किंमतीला विकावी लागणार आहेत. तरीही ग्रामस्थांसमोरील प्रश्नांची गर्दी थांबणार नाही.परिसरातील भीषण परिस्थितीकडे प्रशासनासह लोकप्रतिनिधींनीही गांभीर्याने पहावे, अशी आर्त हाक बाणूरगड परिसरातील दुष्काळग्रस्तांनी दिली आहे.प्रशासन, नेत्यांकडून दुष्काळी भाग दुर्लक्षितगेल्या चार वर्षांपासून बाणूरगड परिसरात पाऊस पडला नाही. परिणामी, चारा उत्पन्न झाले नाहीच, शिवाय पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न यावर्षी मोठ्या प्रमाणात गंभीर बनला आहे. शासनाकडे टॅँकरच्या खेपा वाढवून देण्याबाबत वारंवार पाठपुरावा केला. परंतु, त्याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. आमच्या मागणीकडे प्रशासनासह लोकप्रतिनिधींनीही दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे चाºयाअभावी पशुधन धोक्यात आले आहे. चाºयासाठी जनावरे गोठ्यात हंबरडा फोडत आहेत. पण त्यांच्याकडे केवळ पाहत बसण्याशिवाय लोकांपुढे पर्याय उरला नसल्याचे बाणूरगडचे सरपंच सज्जन बाबर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.