शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

द्राक्षशेती धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2017 23:45 IST

लोकमत न्यूज नेटवर्कतासगाव : तालुक्याच्या सर्व भागात वादळी वाºयासह पाऊस पडत असून शनिवारी रात्रभर पाऊस पडल्याने फ्लॉवरिंग स्टेजला आलेल्या द्राक्षबागांतील घडांमध्ये पाणी साचून ते कुजत आहेत. दिवसभर ढगाळ हवामानामुळे दावण्या रोगाचा मोठा हल्ला झाला आहे. त्यामुळे द्राक्षबागायतदार हवालदिल झाले आहेत.सध्या द्राक्षाचा हंगाम ऐन बहरात आहे. दोन वर्षापूर्वी निलोफर चक्रीवादळाचा जोरदार ...

लोकमत न्यूज नेटवर्कतासगाव : तालुक्याच्या सर्व भागात वादळी वाºयासह पाऊस पडत असून शनिवारी रात्रभर पाऊस पडल्याने फ्लॉवरिंग स्टेजला आलेल्या द्राक्षबागांतील घडांमध्ये पाणी साचून ते कुजत आहेत. दिवसभर ढगाळ हवामानामुळे दावण्या रोगाचा मोठा हल्ला झाला आहे. त्यामुळे द्राक्षबागायतदार हवालदिल झाले आहेत.सध्या द्राक्षाचा हंगाम ऐन बहरात आहे. दोन वर्षापूर्वी निलोफर चक्रीवादळाचा जोरदार फटका तासगाव तालुक्यातील द्राक्षबागायतदारांना बसला होता. या धर्तीवर हवामान बिघडल्याने व पावसाने द्राक्षबागायतदार गारठले आहेत. पावसामुळे द्राक्षाचे घड कुजले असून दावण्या रोगाने आगाप द्राक्ष बागायतदार उद्ध्वस्त झाला आहे. नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी होत आहे.द्राक्षपंढरी म्हणून तासगाव तालुक्याची देश-विदेशात ओळख आहे. तालुक्यात हजारो एकर क्षेत्रावर द्राक्षशेती केली जाते. तासगावची उच्च प्रतीची द्राक्षे व बेदाणा देश-विदेशात पाठविला जातो. दोन वर्षांपूर्वी निलोफर चक्रीवादळामुळे तालुक्यात पावसाने थैमान घातले होते. फ्लॉवरिंग स्टेजलाच पाऊस, धुके व ढगाळ हवामानामुळे दावण्या रोगाचा मोठ्या प्रमाणात द्राक्षबागांवर फैलाव झाला होता. शेकडो एकर क्षेत्र या रोगास बळी पडले होते.ंबागायतदार गारठलागेल्या ५ दिवसांपासून तासगाव तालुक्यात दिवसा ढगाळ हवामान आहे, तर रात्री पाऊस पडत आहे. त्यामुळे दावण्या रोगाचा फैलाव मोठ्या प्रमाणात बागांवर होत आहे. सध्या द्राक्षाची वांझ काढणे, डिपिंग, व फ्लॉवरिंग अवस्था आहे. यादरम्यान दावण्याचा फैलाव वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे द्राक्षबागायतदार गारठला आहे. औषध कंपन्यांना मात्र सुगीचे दिवस आले आहेत. दावण्या रोगाचा हल्ला रोखण्यासाठी बागायतदार महागडी विविध कंपन्यांची औषधे खरेदी करताना दिसत आहेत. मात्र गुणवत्ता कमी असल्याने त्यांचा फारसा परिणाम होताना दिसत नाही. रब्बीच्या हरभरा, शाळू, गहू या पिकांना हा पाऊस पोषक असला तरी, द्राक्षांना मारक ठरत आहे.