शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

दंडोबा, गिरलिंग सोयी-सुविधांच्या प्रतीक्षेत

By admin | Updated: August 11, 2014 00:21 IST

भाविकांत नाराजी : बेळंकीचे शिवमंदिर, लिंगनूरच्या पुरातन देगल मंदिराचीही दुरवस्था

प्रवीण जगताप - लिंगनूर ,  श्रावणात गर्दी होणारी मिरज व कवठेमहांकाळ तालुक्यातील तीर्थक्षेत्रे व मंदिरे सुविधांच्या प्रतीक्षेत आहेत. श्रावणात दंडोबा, गिरलिंग, लिंगनूरचे पुरातन देगल मंदिर, बेळंकीचे मंदिर व मठात गर्दी असते. गिरलिंग मंदिर येथे तर यात्राच भरते, तर शेवटच्या श्रावण सोमवारी या सर्वच मंदिरांत भाविकांची गर्दी उसळते. मात्र येथील रस्ते, पाणी, बागबगीचा, पर्यटन विकास याबाबत प्रशासन उदासीन आहे.मिरज तालुक्यातील दंडोबा डोंगरात असणाऱ्या दंडनाथ मंदिर परिसरात सुविधांची वानवा आहे. ‘क’ दर्जाचे तीर्थक्षेत्र असूनही येथील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न प्रलंबित आहे. तीर्थक्षेत्र विकासाचा आराखडा तयार आहे. त्याचा दोन कोटींचा निधीही मंजूर आहे. त्यातून पहिल्या टप्प्यात सभामंडप, मंदिराच्या डागडुजीचे काम झाले आहे. सध्या येथे बागबगीचा विकसनाचे काम सुरू आहे, तर काही पॉर्इंट्सवर पुलाचे काम सुरू होत आहे. पूल व कठडे बांधून येथे पर्यटन पॉर्इंट विकसित करण्यात येणार आहेत. या सर्व पर्यटन विकासाची गती मात्र अत्यंत धिमी आहे. दंडोबा येथे जाण्यास केवळ खरशिंगमार्गेच चांगला रस्ता उपलब्ध असून, तो दोन किलोमीटरचा रस्ता अद्याप कच्चाच आहे. गिरलिंग डोंगरात श्रावण सोमवारी जणू यात्राच भरते. उंचावर असणारे मंदिर, जवळून अनुभवता येणारे ढग, मंदिराच्या वरील बाजूस असणारे विस्तीर्ण उंचीवरचे पठार पाहता, येथे पर्यटनास आवश्यक पॉर्इंट्स विकसित केले पाहिजेत. येथेही बगीचा निर्माण करून लहान मुलांच्या खेळण्याचे साहित्य बसवून शालेय सहलींसाठी खास व्यवस्था करणे गरजेचे आहे. या डोंगरानजीक जुना पन्हाळा असे ठिकाण आहे. लिंगनूर येथील देगल मंदिरात शंकराची पिंड असून, हे पुरातन मंदिर चौदाव्या शतकातील हेमाडपंथी मंदिर असल्याचे मानले जाते. येथे ‘लोकमत’ने केलेल्या पाठपुराव्यामुळे पुणे येथील पुरातत्त्व विभागाकडून एकदा छायाचित्रण करण्यात आले होते; मात्र या मंदिराच्या देखभाल, दुरूस्तीसह मंदिर विकासासाठी निधीची उपलब्धता झाली नाही. भाविक मात्र या परिसराची स्वच्छता ठेवून श्रावण महिन्याच्या कार्यक्रमांचे आयोजन करतात. बेळंकी येथील मठातही शिवमंदिर असून, चार वर्षांपूर्वी जनसुराज्य पक्षाचे प्रमुख विनय कोरे यांनी भेट देऊन मंदिराचा पर्यटन क्षेत्रात समावेश करण्यासह विकास करू, असे आश्वासन दिले होते; मात्र ते आश्वासनच राहिले. हे मंदिरही सुविधांपासून वचित आहे. येथे शेवट श्रावण सोमवारी भंडारा नावाचा धार्मिक कार्यक्रम उत्साहात पार पडतो, तर गुरूपौर्णिमेला लिंगायतधर्मियांची गर्दी होते. बेळंकी-सलगरे रस्त्यापासून मंदिराकडे जाण्याचा मार्ग डांबरी करण्याची मागणी आहे.