शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
4
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
5
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
6
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
7
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
8
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
9
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
10
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
11
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
12
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
13
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
14
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
15
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
16
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
17
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
18
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
19
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
20
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
Daily Top 2Weekly Top 5

दीड लाख नव्हे, संपूर्ण कर्जमाफी हवी : रघुनाथदादा पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2017 20:35 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रत्येक वेळी कर्जमाफीच्या वेगवेगळ्या घोषणा करून शेतक-यांची फसवणूक करीत आहेत.

सांगली, दि. 28 - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रत्येक वेळी कर्जमाफीच्या वेगवेगळ्या घोषणा करून शेतक-यांची फसवणूक करीत आहेत. कर्जमाफीच द्यायची आहे, तर अर्जाच्या नावाखाली वेळकाढूपणा कशासाठी करता ?, असा सवाल शेतकरी संघटना अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केला. तसेच दीड लाख नव्हे, संपूर्णच कर्जमाफी झाली पाहिजे, यासाठी आर या पारची लढाई लढण्यासाठी शेतकरी सज्ज झाला आहे, असा इशाराही त्यांनी दिला.ते पुढे म्हणाले की, केंद्र आणि राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. या शेतक-यांना कर्जातून मुक्त करण्याची जबाबदारी शासनाचीच आहे. कर्जमाफी करून शेतक-यांवर उपकार करण्याची काहीच गरज नाही. कर्जमाफीचा एकदा निर्णय घेतल्यानंतर, दहा वेळा शासनाने आदेश बदलण्याची काहीच गरज नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने कर्जमाफीची घोषणा केली जाते. पण त्यांच्यासारखे तात्त्विक धोरण राबविण्यात मुख्यमंत्री फडणवीस पूर्णत: अपयशी ठरले आहेत. कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतला असताना शेतक-यांकडून अर्ज भरून पुन्हा काय साध्य करणार आहेत? शेतक-यांना कर्जमाफीपासून वंचित ठेवण्याचे एकमेव धोरण फडणवीस सरकारचे आहे. त्यामुळे शेतक-यांनी शासनाकडून जाहीर केलेले कोणतेही अर्ज भरून देऊ नयेत, ते पूर्णत: बोगस आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांनी याच अधिवेशनात शंभर टक्के कर्जमुक्ती शेतक-यांना दिली पाहिजे. ज्या शेतक-यांनी कर्ज भरले असेल, त्यांनाही पैसे परत दिले पाहिजेत. याबद्दल ठोस निर्णय न झाल्यास रस्त्यावरील लढाई करून सरकारला  कोंडीत पकडल्याशिवाय राहणार नाही. १५ ऑगस्ट रोजी एकाही मंत्र्याला ध्वजारोहण करू देणार नाही. राज्यभरातील शेतक-यांच्या मनामध्ये प्रचंड उद्रेक असल्यामुळे शेतकरी आणि त्यांची पोरे पेटून उठली आहेत. तेच मंत्र्यांना ध्वजारोहण करण्यापासून रोखणार आहेत, असा इशाराही रघुनाथदादांनी दिला. ध्वजारोहणास आमचा विरोध नसून मंत्र्यांऐवजी जिल्हाधिकारी, कर्मचारी अथवा शेतकºयांच्या हस्ते ध्वजारोहण केल्यास त्याचे आम्ही स्वागतच करू, असेही त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांचा सज्जनपणाचा आवचमुख्यमंत्री फडणवीस सज्जन असल्याचा आव आणत आहेत. प्रत्यक्षात भ्रष्टाचारी आमदार, मंत्र्यांवर ते काहीच कारवाई करीत नाहीत. महाराष्ट्रात एकटे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ हेच भ्रष्टाचारी आहेत, उर्वरित राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधील मंत्री सज्जन आहेत का? त्यांच्यावर कारवाईचा एकही शब्द फडणवीस बोलत नाहीत. म्हणजेच मुख्यमंत्री केवळ सज्जनपणाचा आव आणत असल्याची टीकाही रघुनाथदादांनी केली.बैलगाडी शर्यतीवरील जाचक अटी थांबवा शेतकºयांच्या दबावामुळे अखेर केंद्र आणि राज्य सरकारला झुकावे लागले. म्हणूनच बैलगाडी शर्यतीवरील बंदी शासनाने उठविली आहे. याचप्रमाणे बैलगाडी शर्यती घेण्यासाठी लादलेल्या जाचक अटींतूनही शेतक-यांची सुटका करा. अन्यथा त्यासाठी पुन्हा आम्हाला लढा उभारावा लागेल, असा इशाराही रघुनाथदादांनी दिला. तसेच गोवंश हत्येवरील बंदीही केंद्र व राज्य सरकारने उठवावी, अशीही त्यांनी मागणी केली.