शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

शिराळ्यात साकारणार दाेन मियावकी जंगल प्रकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:28 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शिराळा : संपूर्ण राज्यात सुरू असलेल्या माझी वसुंधरा अभियानांतर्गत शिराळा नगरपंचायतीने दोन मियावकी जंगल निर्मिती प्रकल्प ...

लोकमत न्यूज नेटवर्क

शिराळा : संपूर्ण राज्यात सुरू असलेल्या माझी वसुंधरा अभियानांतर्गत शिराळा नगरपंचायतीने दोन मियावकी जंगल निर्मिती प्रकल्प समाविष्ट केले आहेत. प्लॅनेट अर्थ फाऊंडेशनच्या माध्यमातून उभे राहिलेले हे दोन्ही प्रकल्प शिराळा शहरास वरदान ठरत आहेत.

शिराळा नगरपंचायत ही मियावकी जंगल निर्मिती प्रकल्प ‘माझी वसुंधरा अभियान’मध्ये समाविष्ट करणारी राज्यातील पहिली नगरपंचायत ठरली आहे.

जपानचे प्रसिद्ध वनस्पतीशास्त्रज्ञ डॉ. अकिरा मियावकी यांनी निश्चित केलेल्या पद्धतीनुसार हे प्रकल्प उभे करण्यात आले आहेत. या दोन्ही प्रकल्पांमध्ये ६५ पेक्षा जास्त स्थानिक देशी प्रजातींच्या झाडांचा समावेश केला आहे. तसेच यामध्ये देशी औषधी, मसाल्याच्या, फळांच्या, फुलांच्या विविध जाती आहेत. तरी या प्रकल्पामध्ये एकूण १७०० पेक्षा जास्त झाडांची यशस्वी लागवड करण्यात आली आहे. हा प्रकल्प उभारणे आणि संवर्धनाचे काम प्लॅनेट अर्थ फाऊंडेशनचे अध्यक्ष आकाश पाटील, उपाध्यक्ष प्रणव महाजन यांच्यामार्फत सातत्याने होत आहेत.

पहिला प्रकल्प डॉ. नितीन जाधव आणि दुसरा डॉ. दीपक यादव यांच्या खासगी जागेत उभारण्यात आला आहे. मियावकी जंगल प्रकल्पामध्ये शंभर वर्षांत तयार होणारे नैसर्गिक जंगल दहा वर्षांत तयार होते. २०१९ साली सुरू केलेल्या पहिल्या प्रकल्पातील सर्व झाडांची उंची वीस ते पंचवीस फूट इतकी आहे. २०२० साली सुरू केलेल्या दुसऱ्या प्रकल्पातील झाडांची उंची सहा ते सात फूट आहे. अत्यंत कमी कालावधीत झाडांची एकमेकांमध्ये स्पर्धा लावून हे जंगल शास्त्रीय पद्धतीने तयार केलेले आहे. या जंगलामुळे शिराळा शहरातील वायू प्रदूषण घटण्यास मदत होत आहे, तसेच पक्ष्यांचा अधिवास तयार होणे, भूगर्भातील पाण्याची पातळी वाढणे, विहिरी, कूपनलिका यांना मुबलक पाणी उपलब्ध होणे, जमिनीची धूप थांबणे, सौंदर्यीकरण असे अनेक कायमस्वरूपी फायदे या मियावकी जंगल प्रकल्पाच्या माध्यमातून होत आहेत.

यामुळे नगरपंचायतीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

नगरपंचायतीमार्फत मियावाकी जंगलाच्या संगोपनासाठी लागणाऱ्या आवश्यक गोष्टींचा पुरवठा होत आहे. तसेच अशा प्रकारचे अनेक प्रकल्प राज्यात उभे रहावेत आणि पर्यावरणाचे संवर्धन व्हावे, असे मत नगराध्यक्षा सुनीता निकम, उपनगराध्यक्ष विजय दळवी, मुख्याधिकारी योगेश पाटील यांनी व्यक्त केले आहे.

फाेटाे : ०७ शिराळा २