शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी आभार मानतो, त्यांनी माझे 1000 रुपये वाचवले...!"; फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंची खिल्ली उडवली, नेमकं काय म्हणाले?
2
आशिया चषकातील वादानंतर हवाई दल प्रमुखांचा मोठा दावा; भारताने पाकिस्तानची पाच लढाऊ विमाने पाडली 
3
"...तर रशियाही अणु चाचण्या करेल";व्लादिमीर पुतीन यांची थेट अमेरिकेला धमकी
4
boAt मध्ये मोठी खांदेपालट! गौरव नय्यर नवे CEO; बदलामुळे वार्षिक पॅकेज चर्चेत, किती मिळणार पगार?
5
"हनिमूनच्या रात्री उशिरापर्यंत ते..."; ७५ वर्षीय नवऱ्याच्या मृत्यूवर काय म्हणाली ३५ वर्षांची नवरी?
6
२०२७ पर्यंत ५ राशींना साडेसाती, प्रदोषात ‘हे’ करावे; पंचक कायमचे टळेल, शनि शुभ-कल्याण करेल!
7
पाकिस्तानातील पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, ९ जणांचा मृत्यू, ४ पोलिस गंभीर जखमी
8
नेत्याच्या बिल्डर मित्राला ५ तास दालनाबाहेर बसवले; शंकर पाटोळे लाचेच्या रकमेवर ठाम राहिले, कारवाईसाठी मागितले होते ६० लाख रुपये
9
'नादी लागाल तर तुझ्यासह दादांच्या राजकारणाचा देव्हारा करीन'; जरांगेंचा धनंजय मुंडेंना थेट इशारा
10
पंचक योगात शनि प्रदोष: ‘असे’ करा व्रत, अशुभता होईल दूर; प्रभावी मंत्र जपाने दोषमुक्त व्हाल!
11
हृदयस्पर्शी! "हॅलो अंकल, आईने मला मारलं, प्लीज लवकर या..."; लेकाने थेट पोलिसांना केला फोन
12
मराठीत आदर मिळतो जो हिंदीत नाही... 'घरत गणपती' फेम निकिता दत्ताची प्रतिक्रिया चर्चेत
13
पाकव्याप्त काश्मीरमध्ये सैन्याची थट्टा; फक्त १० रुपयांत गणवेश-हेल्मेट विक्रीला, व्हिडीओ व्हायरल
14
"तुझे न्यूड पिक्चर पाठवतेस का?" अक्षय कुमारच्या मुलीला आला धक्कादायक मेसेज, काय घडलं नेमकं?
15
केएल राहुलचा 'डबल' धमाका! विराट कोहली आणि रोहित शर्माचा कसोटीतील मोठा विक्रम मोडला
16
तुम्हीही टोल भरताय? मग जाणून घ्या, देशात 'या' लोकांना नियमानुसार मिळते टोलमधून थेट सूट!
17
World Smile Day: ज्याला मिम मटेरिअल समजता, त्याने नुसतं हसून कमावले ३ मिलियन डॉलर!
18
हात पकडून जोरात ओढले..; तीन वर्षीय चिमुकलाने वाचवला आईचा जीव; पाहा धक्कादायक Video
19
"संतोष देशमुखांच्या खुनाचा बदला होणार..."; कसा होणार? मनोज जरांगे यांनी स्पष्टच सांगितलं!
20
भारतीय कंपनी आणतेय ७००० mah बॅटरीवाला प्रिमिअम फोन, ‘Pixel’ सारखा कॅमेरा डिझाइन; पण किंमत नसेल स्वस्त...

अण्णासाहेब डांगे यांना डी.लिट्. द्या

By admin | Updated: July 4, 2017 23:34 IST

अण्णासाहेब डांगे यांना डी.लिट्. द्या

लोकमत न्यूज नेटवर्कइस्लामपूर : राज्याचे माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांच्या कार्याचा आदर्श सर्वांनी घ्यावा. त्यांनी केलेल्या सामाजिक, शैक्षणिक व राजकीय कामाची दखल घेऊन शिवाजी विद्यापीठामार्फत त्यांना डी.लिट्. पदवी मिळाली पाहिजे, असे मत आमदार शिवाजीराव नाईक यांनी व्यक्त केले.माजी मंत्री व राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अण्णासाहेब डांगे यांच्या ८१ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून आमदार नाईक यांच्या आमदार निधीतून राष्ट्रीय महामार्गापासून सूतगिरणीकडे येणाऱ्या रस्त्याच्या खडीकरण व डांबरीकरण कामाची सुरुवात नाईक यांच्याहस्ते करण्यात आली, यावेळी ते बोलत होते. यावेळी आंबा, नारळ, चिक्कू, लिंबू या झाडांचे रोपण करण्यात आले.आमदार नाईक म्हणाले, डांगे यांनी सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात नवीन क्रांती घडवून आणली आहे. लोकशाहीत काम करत असताना आदर्शवत कामाचे उत्तम उदाहरण त्यांनी विधिमंडळातील कामकाजातून समाजापुढे ठेवले आहे. त्यांच्या जीवनावर जीवनगौरव ग्रंथ तयार व्हायला हवा.दीनदयाळ सूतगिरणीचे कार्यकारी संचालक अ‍ॅड. राजेंद्र डांगे यांच्याहस्ते आमदार नाईक यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी माजी आमदार भगवानराव साळुंखे, जिल्हा बँकेचे संचालक सी. बी. पाटील, प्रा. अरुण घोडके, कुंडलिक एडके, सुखदेव पाटील, अजितराव थोरात, उपनगराध्यक्ष दादासाहेब पाटील, माजी नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष शहाजी पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. जि. प. सदस्या सुरेखा जाधव, माजी नगराध्यक्ष सुभाष सूर्यवंशी, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष जयकर कदम, लालासाहेब पाटील, अशोकराव देसाई, नगरसेविका सुनीता सपकाळ, जयश्री माळी, जयश्री पाटील, शिवाजी डांगे, सी. एच. पाटील, धनपाल माळी, सरपंच सदाशिव दिंडे, रेश्मा मुल्ला, मधुकर वीरकर, किसन गावडे, सुनील कचरे, प्रकाश कनप, कृष्णदेव शेळके, अशोकराव पाटील, भानुदास वीरकर, विलासराव बारपटे, अ‍ॅड. मारुती जाधव यावेळी उपस्थित होते.अध्यक्ष बाळासाहेब खैरे यांनी प्रास्ताविक केले. बजरंग कदम, ए. के. पाटील यांनी सूत्रसंचालन केले. सरव्यवस्थापक विनोद देशमुख, आर. एस. मिरजे यांनी संयोजन केले.