शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

मिरजेत बाजारात खरेदीसाठी गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:26 IST

मिरज : लॉकडाऊनच्या भीतीने मिरजेत बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी नागरिकांची झुंबड उडाली. अत्यावश्यक वगळता अन्य दुकानदारांवर पोलिसांनी कारवाई केली. शनिवार व ...

मिरज : लॉकडाऊनच्या भीतीने मिरजेत बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी नागरिकांची झुंबड उडाली. अत्यावश्यक वगळता अन्य दुकानदारांवर पोलिसांनी कारवाई केली.

शनिवार व रविवारी वीकेंड लॉकडाऊन संपल्यानंतर सोमवारी सकाळपासून मिरज शहरातील विविध बाजार पेठेत खरेदीसाठी झुंबड उडाली होती. मंगळवारी गुढीपाडवा व संभाव्य लॉकडाऊनमुळे बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी करणारे नागरिक कोरोना विसरले होते. महापालिका पथकाकडून कारवाई सुरू असतानाही त्यास कोणी जुमानत नसल्याने फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला होता. अत्यावश्यक सेवा वगळता अन्य दुकानेही सकाळी उघडल्याने शहर पोलीस निरीक्षक राजू ताशीलदार यांनी पोलीस पथकासह फिरून ही दुकाने बंद केली. दुकाने उघडून नियमाचे उल्लंघन करणाऱ्यावर कारवाई करण्याचा इशारा दिल्याने अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने बंद झाली. मात्र, भाजी बाजार आणि किराणा दुकानांत गर्दी होती.

आता पुन्हा ७ किंवा १५ दिवसांचा लॉकडाऊन होणार असल्याच्या शक्यतेने नागरिक संभ्रमात होते. सोमवारी सकाळपासूनच लक्ष्मी मार्केट परिसर, लोणी बाजार, दत्त चौक, गाडवे चौक येथे मोठ्या भाजीभाजार सुरू झाला. सराफ पेठही सुरू झाल्याने खरेदीसाठी गर्दी झाली. पोलिसांनी कठोर पावित्रा घेत रस्त्यावरील विक्रेत्यांना पिटाळून लावले. मात्र, काही वेळानंतर पुन्हा बाजार सुरू झाला. लोणी बाजार ते दत्त चौक रस्त्यावर प्रशासनाला न जुमानता भाजीविक्रेत्यांची मोठी गर्दी झाल्याने सोशल डिस्टन्सचा फज्जा उडाला. शहरात बेकऱ्या किराणा दुकानाशिवाय मोबाइल दुरुस्ती, वाहन दुरुस्ती, वाहनांचे सुटे भाग, पुस्तके विक्री यासह इतर दुकाने पोलिसांनी बंद केली. मार्केट सोमवार पेठ शनिवार पेठ किसान चाैक हायस्कूल रस्त्यावरील बाजारपेठात गर्दी होती. मार्केट परिसरात हातगाड्या पुन्हा रस्त्यावर आल्या होत्या. रस्त्यांवर व बाजारात गर्दी करणारे कोरोना संसर्गाचा धोका विसरल्याचे चित्र होेते.