शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

पॅराप्लेजियाग्रस्त रणजीतसाठी डॉक्टर मित्रांचे क्राऊड फंडिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:19 IST

संतोष भिसे-लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : डॉक्टर होण्याच्या शेवटच्या पायरीवरच रणजीतला पॅराप्लेजियाने ग्रासले. २४ वर्षांचा हा उमदा तरुण लुळा-पांगळा ...

संतोष भिसे-लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : डॉक्टर होण्याच्या शेवटच्या पायरीवरच रणजीतला पॅराप्लेजियाने ग्रासले. २४ वर्षांचा हा उमदा तरुण लुळा-पांगळा बनला. त्याला पुन्हा स्वत:च्या पायावर उभे करण्यासाठी सहाध्यायी पुढे सरसावले. क्राऊड फंडिंग सुरू केले. सात लाख रुपये उभे राहिले. माणुसकीच्या या महायज्ञात समाजानेही मदतीची समिधा टाकण्याचे आवाहन डॉक्टरमित्रांनी केले आहे.

पुण्याचा रणजीत धबाले मिरजेच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा २०१५च्या बॅचचा विद्यार्थी. २०१८ मध्ये पाठीत आणि पायात वेदना जाणवू लागल्या. तपासणीअंती मणक्यात गाठ सापडली. अत्यंत जोखमीच्या शस्त्रक्रिया आवश्यक होत्या, पण कुटुंबाने धीर सोडला नाही. पुण्यात खासगी नोकरी करणाऱ्या वडिलांनी आयुष्यभराची पुंजी पणाला लावली. लागोपाठ दोन शस्त्रक्रिया झाल्या. १५ लाख रुपये संपले. गाठ निघाली, पण पायांची विकलांगता कायम आहे. दोन्ही पायांत पुरेशा संवेदना नाहीत.

पॅराप्लेजिया म्हणजे एक प्रकारे लकवाच. त्याने रणजीतच्या हालचाली थांबल्या, पण शिक्षण मात्र थांबले नाही. त्याचे सहाध्यायीच हातपाय बनले. रणजीतची सुश्रुषा करण्यापासून व्हीलचेअरवरून वर्गात नेईपर्यंत मित्रांनी जबाबदारी पेलली. तेजतर्रार बुद्धिमत्तेच्या रणजीतने मित्रांचा विश्वास सार्थ ठरवला. एमबीबीएस यशस्वीरीत्या पूर्ण केले. डॉक्टर झाला, पण इंटर्नशीप बाकी होती. त्यासाठी प्रत्यक्ष रुग्णालयात काम करणे गरजेचे होते. विकलांग रणजीतला ते शक्य नव्हते. यावेळीही मित्र सरसावले.

दिल्लीतील आयबीएस रुग्णालयात रोबोटिक सायबरडाईन थेरेपीचे यशस्वी उपचार होऊ शकतात हे समजले. त्यासाठी २३ लाखांवर खर्च अपेक्षित होता. मित्रांनी क्राऊड फंडिंग मोहीम सुरू केली. मिलाप संकेतस्थळावर रणजीतचा संघर्ष अपलोड केला. मदतीचे आवाहन केले. खटाटोपाला यश आले. सात लाख ११ हजार रुपयांचा निधी उभा राहिला. प्राध्यापक, कर्मचाऱ्यांसह अमेरिका, इंग्लंडमधूनही हात पुढे आले. मिरज आयएमएने पुढाकार घेतला. त्यांच्या माध्यमातून महाराष्ट्र आयएमए पुढे येत आहे. मिरज वैद्यकीय महाविद्यालयातून बाहेर पडलेल्या शेकडो डॉक्टर्सनी मदतीच्या महायज्ञात भाग घेतला आहे. अद्याप १६ लाख रुपये गोळा व्हायचे आहेत.

कोट

भविष्यात डॉक्टर होऊन समाजाच्या सेवेत वाहून घेणाऱ्या डॉ. रणजीतला मदतीची नितांत गरज आहे. उमेदीच्या वयातला तरुण अंथरुणाला खिळून राहणे वेदनादायी आहे. मदतीचे हात पुढे येण्याची गरज आहे.

- प्रा. प्रिया प्रभू-देशपांडे, सहयोगी प्राध्यापक, मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय