शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
2
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
3
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
4
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
5
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
6
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
7
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
8
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
9
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
10
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
11
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
12
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
13
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
14
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
15
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
16
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
17
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
18
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
19
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
20
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात वादळामुळे कोट्यवधीचे नुकसान

By admin | Updated: May 20, 2016 23:39 IST

शेतकऱ्यांना सर्वाधिक फटका : जत, कवठेमहांकाळ, मिरज तालुक्यात घरांची पडझड; केळीच्या बागा जमीनदोस्त

सांगली : जिल्ह्यात बुधवारी आणि गुरुवारी झालेल्या वादळी पावसाने जत, आटपाडी, कडेगाव, पलूस, कवठेमहांकाळसह मिरज पूर्व भागाला झोडपले. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे कोट्यवधी रूपयांचे नुकसान झाले आहे. घरांच्या पडझडीसह केळीच्या बागा, पानमळे जमीनदोस्त झाले. जनावरांच्या मृत्यूसह अनेक दुर्घटनाही घडल्या. विजेच्या तारा तुटून अनेक भागांमधील वीज पुरवठा खंडित झाला होता. महावितरणच्या अधिकाऱ्यांच्या प्रयत्नामुळे शुक्रवारी वीज पुरवठा सुरळीत झाला आहे. महावितरण कंपनीच्या विद्युत तारा व खांब तुटल्यामुळे त्यांचे लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे.शिराळा : शिराळा खुर्द (ता. शिराळा) येथे वारणा नदीच्या पाण्यात सोडलेल्या विद्युत मोटारीच्या तारेमधून पाण्यात वीजप्रवाह उतरल्याने दादू ज्ञानू नांगरे यांची एक गाय व म्हैस विजेच्या धक्क्याने दगावली. या जनावरांचे मालक दादू नांगरे व त्यांच्या पत्नी जिजाबाई नांगरे यांनाही विजेचा धक्का बसला आहे. सुदैवाने हे दोघे यातून बचावले. यामध्ये दादू नांगरे यांचे एक लाखाचे नुकसान झाले.शिराळा खुर्द येथे वारणा नदीकाठी नांगरे टेक नावाचे शेत आहे. येथे अनेक विद्युत मोटारी आहेत. येथे जयसिंग केशव पाटील यांची पाण्यात विद्युत मोटार आहे. दुपारी तीनच्या सुमाास दादू नांगरे व जिजाबाई नांगरे गाय व म्हैशीला पाण्यावर घेऊन आले. यावेळी पाण्याजवळ विद्युत मोटारीच्या जोड असलेल्या तारेमधून विद्युतप्रवाह नदीच्या पाण्यात उतरला होता. प्रथम गाय पाण्यात शिरताच तिला विजेचा प्रचंड धक्का लागून ती पाण्यातच मृत्यमुखी पडली. पाठोपाठ म्हैसही पाण्यात गेली. म्हैशीलाही विजेचा धक्का बसून तीही दगावली. यावेळी पाठोपाठ आलेल्या जिजाबाई यांनाही विद्युत वायरचा धक्का बसल्याने त्याही पाण्याबाहेर पडल्या. त्यांना वाचविण्यासाठी गेलेले दादू नांगरे यांनाही विजेचा धक्का बसला. या घटनेचा पंचनामा केला आहे. ढालगाव : ढालगावसह परिसरातील घरांना वादळी वाऱ्याचा जोरदार तडाखा बदल्याने अनेकांचे संसार उघड्यावर पडले, तर कौलारु घरांचे छत, पत्र्याच्या घरांचे छत, वैरणीच्या गंजी, पान टपऱ्या उडून गेल्या आहेत. विजेचे खांब वाकले, तारा तुटल्याने अठरा तास वीजपुरवठा खंडित झाला होता, तर विजापूर -गुहागर राज्यमार्गावर झाडे कोसळल्याने २४ तास वाहतूक बंद होती. तीन महिलांसह एक जखमी झाला. चोरोची येथील जया कांबळे (वय २२) यांच्या डोक्यात घराची वीट पडून त्या गंभीर जखमी झाल्या आहेत. (वार्ताहर)सद्गुरु कारखाना : ९५ लाखांची हानीआटपाडी : राजेवाडी (ता. आटपाडी) येथील श्री श्री सद्गुरू साखर कारखान्याचे बुधवार, दि. १८ रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास झालेल्या वादळी वाऱ्याने ९५ लाख रुपयांचे नुकसान झाले. हा साखर कारखाना सांगली आणि सोलापूर जिल्ह्याच्या सीमेवर आहे. बुधवारी सायंकाळी जोराचे वादळी वारे आले. त्यामुळे साखर कारखान्यातील अनेक यंत्रसामग्रीसह पत्रे, भिंत पडून मोठे नुकसान झाले. साखर भरली जाते, त्या विभागातील रॉड, ३० मीटर स्ट्रक्चर कॉलम, सहा मीटर उंच व २१ मीटर लांबीची सिमेंट भिंत पडली. २०० प्रिकोटेड पत्रे छतावरून उडून गेले. स्वयंचलित वजन करणारे यंत्र मोडले. साखर वाहून नेणारा बेल्ट तुटला. २ टन रेलिंग पाईप तुटली. साखर पोती वाहून नेणारे बेल्ट तुटले. मोलॅसिसची टाकी फुटली. तिथली कुंपणाची भिंत पडली. एटीपी प्लॅँट इमारतीवरील पत्रे उडून गेले. कारखान्याच्या व्यवस्थापनाने या वादळी वाऱ्यामुळे कारखान्याचे १ कोटी ३० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा केला आहे. मात्र महसूल प्रशासनाने ९५ लाख रुपये नुकसान झाल्याचा पंचनामा केला आहे. घटनास्थळी तहसीलदार अजितसिंह पाटील, गावकामगार तलाठी माणिकराव देशमुख यांनी भेट देऊन पंचनामा केला.