शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

संस्था निवडणुकीतून कोटींची उड्डाणे

By admin | Updated: January 20, 2015 00:55 IST

सांगली जिल्ह्यातील स्थिती : खर्चाचा आराखडा बदलला

अविनाश कोळी - सांगली -जिल्ह्यात सहकारी संस्थांच्या निवडणुकांची धामधूम सुरू असून, यंदा प्राधिकरणाने खर्चासाठी ठराविक आराखडा आखून दिलेला आहे. या आराखड्यानुसार ढोबळमानाने निवडणूक निधी जमा करण्याचे आदेश सहकारी संस्थांना देण्यात आले असून, किमान सरासरी अंदाजित आकडे गृहीत धरले तरी, या निवडणुकीच्या माध्यमातून पाच कोटींचा चुराडा होण्याची शक्यता आहे.  -राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने निवडणूक खर्चासंदर्भात यापूर्वीच आराखडा निश्चित करून तो संबंधित जिल्ह्यांना पाठविला आहे. चार गटात सहकारी संस्थांची वर्गवारी केली असून, यातील अ आणि ब गटातील संस्थांच्या निवडणुकांचाच खर्च कोटींच्या घरात जाणार आहे. ‘क’ गटातील संस्थांच्या निवडणुका बिनविरोध झाल्या असल्या तरी त्यांना अत्यल्प खर्च आला आहे. या गटातील सर्वच सहकारी संस्थांच्या निवडणूक निधीच्या कमीत कमी अंदाजित खर्च १० हजार गृहीत धरला तरी, तो ५४ लाखांच्या घरात जातो. ‘अ’ आणि ‘ब’ गटातील निवडणुकांचा खर्च साडेतीन कोटींच्या घरात जाणार आहे. अ व ब वर्गातील खर्चाचा आराखडापद परिश्रमिक दर (निवडणूक झाल्यास)जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी मूळ वेतनाच्या दहा टक्के किंवा दीड हजार यापैकी कमी असेल तेनिवडणूक निर्णय अधिकारी मूळ वेतनाच्या २५ टक्के किंवा ६ हजार यापैकी कमी असेल तेसहा. निवडणूक निर्णय अधिकारीमूळ वेतनाच्या २५ टक्के किंवा ३ हजार यापैकी कमी असेल तेमतदान केंद्राध्यक्ष/मतमोजणी पर्यवेक्षक३५0 रुपये प्रतिदिनमतदान अधिकारी/मतमोजणी सहाय्यक२५0 रुपये प्रतिदिनचतुर्थश्रेणी कर्मचारी १५0 रु. प्रतिदिनभोजनाची पाकिटे, सौम्य अल्पोपहार१५0 रु. प्रतिदिनजिल्हा निवडणूक नियंत्रण कक्ष कर्मचारी ५00 प्रती कर्मचारी एकदाच निवडणूक खर्च/आचारसंहिता ५00 प्रती कर्मचारी एकदाचनियंत्रण कक्ष कर्मचारीकाटकसरीच्या सूचना प्राधिकरणाने निवडणूक निधी व त्यासंदर्भातील खर्चाचा आराखडा दिला असला तरी, शक्य तेवढी काटकसर करण्याची सूचना त्यांनी दिली आहे. जिल्हा, तालुका तसेच प्रभाग सहकारी निवडणूक निर्णय अधिकारी यांनी निवडणुकांवरील खर्च शक्य तेवढा कमीत कमी ठेवण्याचा प्रयत्न करण्यात यावा व काटकसरीचे धोरण ठेवावे, असे स्पष्ट नमूद करण्यात आले आहे. शिल्लक रक्कम परतनिवडणूक निधी म्हणून जमा केलेल्या पैशातून झालेला एकूण खर्च वगळता काही रक्कम शिल्लक असेल, तर ती दोन महिन्यांच्या आत संबंधित संस्थेला परत करण्याबाबतचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.