शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

सरळ मार्गावरील वाकडी चाल ठरतेय घातक<bha>;</bha>

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 04:38 IST

अविनाश कोळी लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : महाराष्ट्रात होणाऱ्या एकूण अपघातात तब्बल ७७ टक्के अपघात हे सरळ असलेल्या मार्गावर ...

अविनाश कोळी

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : महाराष्ट्रात होणाऱ्या एकूण अपघातात तब्बल ७७ टक्के अपघात हे सरळ असलेल्या मार्गावर होत आहेत. सरळ मार्गावर मानवी चुकांची वाकडी चाल ९ हजार ८७१ लोकांच्या जिवावर बेतली, तर यात १४ हजार लोकांना गंभीर स्वरूपाच्या दुखापतीस सामोरे जावे लागले.

राज्यातील तीन वर्षातील आकडेवारीचा विचार करता, कोणतेही अडथळे नसलेल्या सरळ रस्त्यावर सर्वाधिक अपघात झाले आहेत. २०१९ मध्ये २५,३७० अपघात या सरळ मार्गावर घडले. वळणाच्या वाटेवर एकूण ४ हजार २७१ अपघात होऊन त्यात १ हजार ५८५ लोकांचा बळी गेला. पुलांवरील अपघातांचे प्रमाण तुलनेने खूप कमी आहे.

अंधुक प्रकाश, धुके,, पाऊस,, गारपीट यासारख्या नैसर्गिक अडचणींपेक्षा स्वच्छ सूर्यप्रकाशात सर्वाधिक अपघात झाले आहेत. हीसुद्धा धक्कादायक बाब आहे. राज्यात सरळ रस्त्यावर स्वच्छ सूर्यप्रकाश असताना होणाऱ्या अपघातांचे विश्लेषण केल्यानंतर, मानवी चुकांची मोठी यादी समोर येते. २०१९ मध्ये स्वच्छ सूर्यप्रकाशात ९६ टक्के अपघात घडले. यात १२ हजार ७८८ लोकांचा बळी गेला. अन्य नैसर्गिक अडचणींमध्ये ४ टक्के अपघात झाले. त्यामुळे जर वाहनधारकांनी योग्य काळजी घेत वाहतूक नियमांचे पालन केल्यास रस्त्यावरील अपघातांवर बऱ्याच प्रमाणात नियंत्रण मिळविता येऊ शकते.

चौकट

जोडरस्त्यावरील अपघातांचे प्रमाण

जंक्शन अपघात बळी

टी जंक्शन १६३९ ५७९

वाय जंक्शन ७३५ २४९

चौक ७९७ २२२

गोलाकार रस्ता ४१४ १३२

तिरके चौक ३१४ ९९

चौकट

तीन वर्षातील स्थिती...

वर्ष अपघात बळी गंभीर जखमी

२०१७ ३६०५६ १२५११ २०७६७

२०१८ ३५७१७ १३२६१ २०३३५

२०१९ ३२९२५ १२७८८ १९१५२

चौकट

काय करता येईल

रस्त्यांवर गतिमर्यादा तपासणारी यंत्रणा ठिकठिकाणी बसवावी

हेल्मेट व सिटबेल्टबाबत अधिक काटेकाेर तपासणी व्हावी

नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची गरज

मद्य पिऊन वाहन चालविणाऱ्यांची दररोज तपासणी व्हावी

मोबाईलवर बोलत वाहन चालविणाऱ्यांवर कडक निर्बंध घालावेत