शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

देशात आणीबाणीपेक्षा गंभीर परिस्थिती

By admin | Updated: February 21, 2016 01:03 IST

सीताराम येचुरी : नरेंद्र मोदी हिटलर, मुसोलिनी बनू पाहात आहेत; फॅसिझम व्यवस्थेचे षड्यंत्र

इस्लामपूर : देशात सध्या आणीबाणीपेक्षाही भयंकर परिस्थिती आहे. हिंदू धर्मराष्ट्राची संकल्पना मांडत राष्ट्रवादाच्या नावाखाली फॅसिझम व्यवस्था आणण्याचे षड्यंत्र रचले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हिटलर आणि मुसोलिनी बनू पाहात आहेत, असा घणाघाती हल्ला मार्क्सवादी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस खा. सीताराम येचुरी यांनी चढवला. इस्लामपूर (जि. सांगली) येथे निवृत्त प्राचार्य विश्वास सायनाकर यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवस सत्कार सोहळ्यात खा. येचुरी बोलत होते. ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. एन. डी. पाटील अध्यक्षस्थानी होते. माजी मंत्री, आमदार जयंत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी येचुरी यांच्याहस्ते सायनाकर यांचा सत्कार करण्यात आला. येचुरी म्हणाले की, साम्राज्यवाद, धार्मिक कट्टरतावाद आणि उच्चस्तरीय शिक्षण संस्थांमधील वाढता हस्तक्षेप अशा तिन्ही मुद्द्यांवर भाजपचे राज्यकर्ते हिंदू राष्ट्राचा अजेंडा राबवत आहेत. देशाची एकता व अखंडता धोक्यात आणून देशाचे तुकडे पाडण्याची नीती आखली जात आहे. देशातील फक्त १०० व्यक्ती अब्जाधीश आहेत. देशाचा मानवी विकास निर्देशांक हेच लोक ठरवतात. देशातील ९० टक्के कुटुंबाचे दरमहा उत्पन्न १० हजार रुपयांपेक्षाही कमी आहे. देशाची आर्थिक परिस्थिती खालावली आहे. मोदींच्या कार्यकाळात शेतकऱ्यांच्या आत्महत्यामध्ये २६ टक्क्यांनी वाढ झाली आहे. अशा परिस्थितीत ‘मेक-इन-इंडिया’सारखी घोषणाबाजी फसवणूक करणारी आहे. प्रा. डॉ. एन. डी. पाटील म्हणाले की, कर्तबगार विद्यार्थ्यांची पिढी घडवणाऱ्या प्राचार्य विश्वास सायनाकर यांनी श्रमजिवी जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी मोठे कष्ट घेतले आहेत. सर्वस्पर्शी व्यक्तिमत्त्व म्हणून ते आदरणीय आहेत. समाजासाठी समर्पित भावनेने काम करणाऱ्या सायनाकरांचा अमृतमहोत्सवी गौरव इतरांना पथदर्शी आहे. आ. जयंत पाटील म्हणाले की, मूल्यांची जपणूक करुन जगणारी माणसे आयुष्यात समाधानी असतात, त्यामध्ये सायनाकरांचा समावेश आहे. शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न नवीन पिढी घडवण्यास उपयुक्त ठरतील. सत्काराला उत्तर देताना प्राचार्य सायनाकर म्हणाले की, माझे विद्यार्थी नवीन पिढी घडवण्याची परंपरा जपत आहेत, याचा अभिमान वाटतो. धनाजी गुरव यांनी मनोगत व्यक्त केले. अमृतमहोत्सवी सत्कार समितीचे अध्यक्ष प्राचार्य एल. जी. दाभोळे यांनी स्वागत केले. संजय बनसोडे, कालिदास पाटील, रवी बावडेकर यांनी सूत्रसंचालन केले. निसर्ग कला मंचच्या कलाकारांनी कष्टकऱ्यांची गीते गायली. प्रा. शामराव पाटील यांनी आभार मानले. कार्यक्रमास संपतराव पवार, व्ही. वाय. पाटील, अरुण लाड, अजितराव सूर्यवंशी अ‍ॅड़ बी. एस. पाटील. डॉ. जे. एफ. पाटील, अ‍ॅड़ सुभाष पाटील, दादासाहेब मंत्री, अ‍ॅड. बी. डी. पाटील, शहाजी पाटील, डॉ. प्रदीप शहा, पै. हणमंतराव पाटील, प्राचार्य डॉ. जे. के. पाटील उपस्थित होते. प्रा. एस. डी. पाटील, एकनाथ पाटील, सतीश चौगुले, डॉ. सूरज चौगुले यांनी संयोजन केले. (वार्ताहर)