शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
3
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
4
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
5
सोशल मीडियावर व्हायरल झालेले खान सर निवडणूक लढवणार?,'आप'च्या संजय सिंह यांची भेट घेतली
6
२४ वर्षाच्या युवतीचा कारनामा, ८ बॉयफ्रेंडकडून लुटले २५ लाख; नवव्याला फसवणार होती, पण... 
7
Nitish Rana: भारतीय क्रिकेटर नितीश राणाने दिली 'गूड न्यूज'; झाला जुळ्या मुलांचा बाबा; पाहा Photo
8
“मराठी भाषा, संस्कृती संपवायला हिंदी सक्ती, भाजपा-RSSचा अजेंडा हाणून पाडू”: हर्षवर्धन सपकाळ
9
भारत चीनला करणार 'बाय-बाय'; आता 'या' देशातून येणार रेअर अर्थ मॅग्नेट; कार कंपन्यांचं टेन्शन संपणार?
10
Video - हॉटेलमध्ये बॉयफ्रेंडसोबत नवऱ्याने रंगेहाथ पकडताच 'ती' झाली स्पायडरमॅन, थेट छतावरुन...
11
एका हाताला लकवा, नीट ऐकताही येत नाही! तरीही ४४ वर्षांपासून अयातुल्ला खामेनेई कसं सांभाळतात इराणचं सरकार?
12
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
13
Fastag New Rules : एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
14
सलमान खानने केली आमिरची चेष्टा, नवीन गर्लफ्रेंडवरुन म्हणाला; "तो परफेक्शनिस्ट..."
15
“पांडुरंग सगळ्यांच्या मनोकामना ऐकतील”; अजितदादा CM होण्याबाबत सुनेत्रा पवारांचे सूचक विधान
16
सोन्याचे दर घसरले, पण चांदीचा विक्रम; किंमत १ लाख १२ हजारांवर; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
17
"आता वेळ आलीय..."; लोकप्रिय अभिनेत्रीसोबत मोठा स्कॅम, स्टायलिस्ट सांगून फसवलं
18
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
19
जिवंत रुग्णाला मृत घोषित केले; डॉक्टरांकडे महापालिकेने मागितला खुलासा
20
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक

सांगलीत कैद्यांभोवती गुन्हेगारांचा गराडा..!

By admin | Updated: July 14, 2014 00:32 IST

सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर : शासकीय रुग्णालयातील चित्र

सचिन लाड : सांगली, औषधोपचारासाठी वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयात (सिव्हिल) आणलेल्या कैद्यांभोवती गुन्हेगारांचा गराडा पडत आहे. विविध विभागात तपासणीच्या नावाखाली कारागृहातील कैद्यांना रुग्णालयात फिरविले जाते. त्यांच्याभोवती गुन्हेगारांचा गराडा एवढा पडतो की, कैदी व त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेले पोलीस त्यामधून दिसतही नाहीत. त्यामुळे कैद्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.जिल्हा मध्यवर्ती कारागृहात रुग्णालय आहे. एखाद्या कैद्याने आजारी असल्याची तक्रार केली, तर त्याच्यावर तातडीने प्राथमिक औषधोपचार केले जातात. यातूनही कैद्याची प्रकृती सुधारली नाही, तर त्याला पुढील उपचारासाठी शासकीय रुग्णालयात आणले जाते. कारागृहाबाहेर कैद्याला नेल्यानंतर त्याच्या सुरक्षेची जबाबदारी पोलिसांवर येते. चार ते पाच कैदी असतील, तर किमान सहा पोलीस सुरक्षेसाठी येतात. पोलीस वाहनातून त्यांना रुग्णालयात आणले जाते. त्यांना प्रथम आकस्मिक दुर्घटना विभागात नेले जाते. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर पुढे अन्य विभागात विविध तपासण्या करण्यासाठी त्यांना फिरविले जाते. तपासणीसाठी अन्य रुग्णांची गर्दी असेल, तर कैद्यांना बाहेर बाकावर बसविले जाते. तत्पूर्वी कैद्यांचे नातेवाईक व गुन्हेगार समर्थकांना याची माहिती पोहोचलेली असते. त्यामुळे ते कैद्याला रुग्णालयात आणण्यापूर्वीच तेथे हजर झालेले असतात.खुनासारख्या गंभीर गुन्ह्यातील कैद्यांना रुग्णालयात तपासणीला आणल्यानंतर, त्यांनी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पलायन केल्याच्या घटना अनेकदा घडल्या आहेत. तरीही पोलीस कोणतीही काळजी घेत नसल्याचे दिसून येते. पाच ते सहा कैदी असतील, तर कोणाच्याही हातात बेडी दिसत नाही किंवा एकमेकांना दोरीनेही बांधलेले नसते. पोलिसांच्या हातात बंदुकही दिसत नाही. दीड ते दोन तास कैदी रुग्णालयात असतात. या काळात त्यांना भेटण्यासाठी नातेवाईकांसह गुन्हेगारही हजेरी लावतात. त्यांच्यात बराच वेळ गप्पा सुरू असतात. तपासणीनंतर जाताना अगदी पोलीसगाडीत बसेपर्यंत हे गुन्हेगार कैद्यांसोबत असतात. अशावेळी पोलीस बघ्याची भूमिका का घेतात, असा प्रश्न उपस्थित होत आहे.