शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
3
बड्या उद्योगपतीकडून फडणवीसांचा 'पंतप्रधान' म्हणून उल्लेख; CM स्वतःही अवाक्! नेमकं काय घडलं?
4
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
5
"मला पॅनिक अटॅक यायचे", आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलली गिरिजा ओक, म्हणाली- "त्यांच्या नात्यात..."
6
१९७१ नंतरचं सर्वात मोठं संकट, बांगलादेशमधील अस्थिरतेमुळं भारतासमोर ५ मोठी आव्हाने
7
Osman Hadi : कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
8
'म्हाडाची जमीन हडपल्याप्रकरणी मंगेश कुडाळकरांवर गुन्हा दाखल करा'; विशेष न्यायालयाचे भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाला निर्देश
9
घराणेशाहीचा वाद! "BMC Election is not a Family Business" भाजपा सचिवाचं अमित साटम यांना पत्र
10
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
11
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
12
YouTube वर ५ लाख सबस्क्रायबर्स होताच 'महाभंडारा'; दीड किमीच्या रांगा, ५ हजार लोकांची गर्दी
13
गौरव म्हणाला, 'रात्र झालीये इथेच थांबा'; मैत्रीण बाहेर गेली अन् २३ वर्षीय खेळाडू तरुणीवर हॉटेलमध्ये बलात्कार
14
वाळवंटी सौदीच्या बर्फाने डाव मांडला! विश्वास बसेना, पण अरब व्हिडीओ पोस्ट करू लागले...; उणे ४ अंशांवर गेला पारा
15
'AQI आणि फुफ्फुसांच्या आजारांमध्ये थेट संबंध नाही...', राज्यसभेत पर्यावरण राज्यमंत्र्यांचे उत्तर
16
बंदुकीच्या धाकावर अल्पवयीन मुला-मुलीला शारीरिक संबंधास पाडले भाग; MMS बनवून पैसे उकळले
17
बांगलादेश पेटला! २८ पत्रकारांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एका हिंदूला झाडाला उलटे टांगून जाळले...
18
एआयमुळे कोणत्या नोकऱ्यांना सर्वाधिक धोका, कोणत्या नोकऱ्यांची घेतोय जागा? जाणून घ्या
19
गुडन्यूज! 'लाफ्टर क्वीन' भारती सिंह दुसऱ्यांदा झाली आई, 'गोला'नंतर आता मुलगा की मुलगी?
20
"तू घाणेरडे Video बघतोस, आमच्याकडे डेटा...", DCP असल्याचं सांगून तरुणाला ४६ हजारांचा गंडा
Daily Top 2Weekly Top 5

जतच्या दोन बीडीओंसह बाराजणांवर फौजदारी

By admin | Updated: February 17, 2017 00:19 IST

मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा आदेश; ‘मनरेगा’मध्ये ३६.७४ लाखांचा अपहार

सांगली : एकुंडी, काशिलिंगवाडी (ता. जत) येथील महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी (मनरेगा) योजनेत बोगस कामे दाखवून ३६ लाख ७४ हजारांचा अपहार झाल्याचा ठपका चौकशी समितीने ठेवला आहे. यामध्ये जतचे तत्कालीन गटविकास अधिकारी ओमराज गहाणे, प्रभारी गटविकास अधिकारी ज्ञानदेव मडके यांच्यासह बाराजणांचा समावेश असून, त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश गुरुवारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिले आहेत.जत तालुक्यातील मनरेगा घोटाळ्याचे प्रकरण गेल्या दोन महिन्यांपासून गाजत आहे. या प्रकरणाची प्राथमिक चौकशी झाल्यानंतर सखोल चौकशीसाठी जिल्हा परिषदेचे प्रकल्प संचालक अजयकुमार माने, ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविकांत अडसूळ, लेखा व मुख्य वित्त अधिकारी डॉ. राजेंद्र गाडेकर, तहसीलदार अभिजित पाटील, कार्यकारी अभियंता एस. ए. बारटक्केयांची समिती स्थापन केली होती. या समितीने प्रत्यक्ष जत पंचायत समिती आणि एकुंडी, काशिलिंगवाडी, बाज या तीन गावांना भेटी देऊन कागदपत्रांची चौकशी केली होती. याचा अहवाल डॉ. भोसले यांच्याकडे सादर झाला असून, त्यांनी तत्काळ दोषींवर फौजदारी कारवाई करण्यासाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे.वार्षिक कृती आराखड्यात एकुंडी गावाचा समावेशच नव्हता. तरीही मनरेगाची बोगस कामे केल्याचे दाखविले आहे. ग्रामपंचायतीचा प्रस्ताव, हजेरी पुस्तक, प्रशासकीय तांत्रिक मान्यतेची नोंद नाही. आॅनलाईन बोगस जॉबकार्ड आणि मस्टर तयार करून २७० मजुरांच्या नावावर २४ लाख १९ लाखांचा अपहार केला आहे. या प्रकरणात तत्कालीन गटविकास अधिकारी गहाणे, प्रभारी गटविकास अधिकारी मडके, कनिष्ठ लेखाधिकारी प्रवीण माने आणि चंद्रकांत कोरे, मल्लिकार्जुन जेऊर, स्वप्निल कोळी, परशुराम कोळी, आनंद हिरगडे या पाच कंत्राटी डाटा आॅपरेटरांवर अपहाराची रक्कम निश्चित केली आहे. यांच्यावर फौजदारी कारवाई करण्यासाठी ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आडसूळ यांची नियुक्ती डॉ. भोसले यांनी गुरुवारी केली आहे.काशिलिंगवाडी येथील चार माती नालाबांधच्या जुन्याच कामांवर यंत्राच्या साहाय्याने मोडतोड करून नवीन बांधल्याचे भासवून शासनाची फसवणूक केली आहे. यामध्ये ग्रामपंचायतीने दुरुस्तीचा प्रस्ताव दिला असताना नवीन बांधल्याचे दाखवून अधिकाऱ्यांनी १२ लाख ५५ हजारांचा अपहार केल्याचा ठपका चौकशी समितीने ठेवला आहे. यामध्ये तत्कालीन व प्रभारी असे दोन गटविकास अधिकारी, कृषी अधिकारी कैलासकुमार मरकाम, ग्रामरोजगार सेवक राहुल देवांग, ग्रामसेवक सचिन सरक, सरपंच एन. डी. बजबळे, लेखाधिकारी प्रवीण माने यांचा समावेश आहे. एकुंडी आणि काशिलिंगवाडी या दोन गावांतील ३६ लाख ७४ हजारांच्या अपहारप्रकरणी दोन गटविकास अधिकारी यांच्यासह बाराजणांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश उपमुख्य कार्यकारी अधिकारी आडसूळ यांना दिले आहेत. दोषारोपपत्राच्या कागदपत्रांसह संबंधितावर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे, असेही डॉ. भोसले यांनी सांगितले.बाज प्रकरणात बीडीओ, सरपंचांसह पाचजणांना नोटिसाबाज येथील पाच सिमेंट बंधाऱ्यांची कामे मनरेगाचे नियम मोडून केली आहेत. ग्रामपंचायतीने कामे करण्याऐवजी ठेकेदाराकडून सर्व कामे केली आहेत. यामध्ये ४५ लाख ३२ हजार ३०० रुपयांच्या खर्चात अनियमितता दिसून येत आहे. याप्रकरणी गटविकास अधिकारी, ग्रामसेवक, सरपंच, सहायक लेखाधिकारी आणि छोटे पाटबंधारे विभागाचे उपअभियंता यांना नोटिसा बजाविण्यात येणार आहेत. खुलासा आल्यानंतर त्यांच्यावर पुढील कारवाई करण्यात येणार आहे, असेही डॉ. भोसले यांनी सांगितले.