शहरं
Join us  
Trending Stories
1
राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर...
2
पहलगाम हल्ल्यानंतर अमेरिकेने ‘TRF’बद्दल घेतला मोठा निर्णय; पाकिस्तानच्या कुरापतींना चाप बसणार!
3
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
4
आजचे राशीभविष्य, १८ जुलै २०२५: 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार लय भारी!
5
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
6
संपादकीय: धन-धान्य कृषी योजना योजना चांगली; पण...
7
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ
8
फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे ‘वन टू वन’; आदल्या दिवशी ऑफर, दुसऱ्या दिवशी संवाद
9
महाराष्ट्रात सिनेमांचे तिकिट २०० रुपये कधी? कर्नाटकाने केली... अव्वाच्या सव्वा तिकिटांच्या दरांनी प्रेक्षक हैराण...
10
...तर पेट्रोल अन् डिझेल होणार स्वस्त; कच्च्या तेलाची किंमत ६५ डॉलर प्रतिबॅरलवर राहिली तर...
11
...हा तर १९ जणांच्या खुनाचा प्रकार : सुप्रीम कोर्ट; पीएम जनआरोग्य योजनेत गरज नसताना अँजिओप्लास्टी 
12
न्या. वर्मा यांच्यावरील महाभियोग प्रस्ताव लोकसभेत की राज्यसभेत? सरकार ठरवणार
13
धनंजय मुंडेंच्या बंगल्यातून फोन आल्यानेच तपास थांबला? महादेव मुंडे खून प्रकरण; ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप
14
सरकार कुणाचे आणायचे हे आता तरुण पोरं ठरवणार, मतदानाचे वय सोळा वर्षे; ब्रिटन सरकारचा निर्णय
15
पत्नीकडे फोन, बँक खात्याचे पासवर्ड मागणे हा घरगुती हिंसाचार, छत्तीसगड उच्च न्यायालय
16
व्यवस्थापन कोट्यातील जागांसाठी विद्यार्थ्यांची लूट; विद्यापीठाने देखरेख समिती नेमावी : युवा सेना
17
व्हिजन डाॅक्युमेंटसाठीचा मसुदा इंग्रजीत! शिक्षणतज्ज्ञांमध्ये आश्चर्य; इंग्रजीला देण्यात आलेल्या प्राधान्याबद्दल आता टीका
18
नवी मुंबई महापालिका राज्यात पहिली; मीरा-भाईंदर देशातले ‘सर्वांत स्वच्छ शहर’
19
हनी-मनिट्रॅप : मंत्री, अधिकारी अस्वस्थ ! ‘आपले नाव त्यात नाही ना?’ अशी धास्ती...
20
अस्वस्थ जगाच्या जखमा कोण बांधू शकेल? - भारत!

जतच्या बीडीओंवर फौजदारीचे आदेश

By admin | Updated: January 24, 2017 23:39 IST

राजेंद्र भोसले : ‘रोहयो’तील कोट्यवधीचा घोटाळा

सांगली : जत तालुक्यातील महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतील आर्थिक घोटाळ्याप्रकरणी जत पंचायत समितीचे तत्कालीन गटविकास अधिकारी ओमराज गहाणे यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ़ राजेंद्र भोसले यांनी मंगळवारी दिले़ अन्य अधिकारी, कर्मचाऱ्यांची चौकशी चालू आहे़जत तालुक्यातील रोजगार हमी योजनेतील कासलिंगवाडी येथील कामामध्ये १२ लाख ५६ हजारांचा अपहार झाला आहे. बाज येथील कामात अनियमितता तसेच खासगी व्यक्तीला काम देऊन कामाचे बिल अदा केल्याचे आढळून आले आहे. कासलिंगवाडीचे र्ग्रामसेवक सचिन नाना सरक, बाजचे तत्कालीन ग्रामसेवक जे. झेड. पावरा, ए. डी. काळे निलंबित आहेत. दरम्यान, पंचायत समितीमधील सहायक लेखाधिकारी व कृषी अधिकारी यांच्यावरही कारवाई होणार आहे. जत पंचायत समिती रोहयो कक्षाकडील कंत्राटी तांत्रिक अधिकारी आणि रोजगार हमीच्या कामावरी कंत्राटी तांत्रिक अधिकारी तसेच कासलिंगवाडी व बाजचे ग्राम रोजगार सेवक यांना कंत्राटी सेवेतून काढून टाकले जाणार आहे़अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई जिल्हा परिषद प्रशासनाने सोमवारी केली आहे़ तसेच जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ़ राजेंद्र भोसले यांनी जत तालुक्यातील रोजगार हमीच्या कामाची प्राथमिक चौकशी केली आहे़ तसेच काही अन्य अधिकाऱ्यांकडूनही माहिती घेतली असता रोजगार हमीच्या घोटाळ्यास पंचायत समितीचे गटविकास अधिकारी गहाणे हे सुध्दा तेवढेच जबाबदार असल्याचे दिसत आहे़ ते सध्या सेवानिवृत्त झाले असले तरीही त्यांचा आर्थिक घोटाळ्याशी संबंध असल्यामुळे त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्याचे अधिकार शासनाला आहेत़ म्हणून गहाणे यांच्यावर फौजदारी कारवाई करण्याचे आदेश रोजगार हमी योजनेकडील संबंधीत अधिकाऱ्यांना दिले आहेत, असेही डॉ़ भोसले यांनी सांगितले़दरम्यान, रोजगार हमीच्या या घोटाळ्यास जिल्हाधिकारी कार्यालयातील काही अधिकारी व कर्मचारीही तेवढेच जबाबदार असल्याची चर्चाही मंगळवारी जिल्हा परिषदेमध्ये चालू होती़ सखोल चौकशीनंतरच घोटाळ्याची साखळी उघडकीस येणार आहे़ (प्रतिनिधी)