शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मारहाणप्रकरणी शिवेंद्रसिंहराजेंवर गुन्हा

By admin | Updated: February 20, 2017 23:48 IST

मेढा पोलिस ठाणे : तीस ते पस्तीस कार्यकर्त्यांविरुद्धही तक्रार

मेढा : जावळी तालुक्यातील पावशेवाडी बामणोली येथे रविवार, दि. १९ रोजी मध्यरात्री १२ ते १२:३० च्या दरम्यान कोणतेही कारण नसताना आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले व त्यांच्या सुमारे ३० ते ३५ कार्यकर्त्यांनी मारहाण करून चारचाकी गाडीचे नुकसान केल्याची फिर्याद मेढा पोलिस ठाण्यात आयुब शमसुद्दीन पठाण (वय २४, रा. सातारा) यांनी दिली असून, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यासह ३० ते ३५ जणांच्याविरुद्ध मेढा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, फिर्यादी हा कुसुंबी गटातील भाजपाच्या उमेदवार मनाली शेलार यांच्या गाडीवर ड्रायव्हर असून, त्याच्यासह आणखी चार ते पाचजणांना मारहाण करण्यात आल्याचे समजते.याबाबत आयुब पठाण यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, रविवारी रात्री १२ ते १२:३० च्या दरम्यान पावशेवाडी-बामणोली गावानजीक असलेल्या दंडवस्तीत आयुब पठाण व जयेश देशमुख, आनंद शिंदे वगैरे चार ते पाचजण तंबाखू घेण्यासाठी थांबले असताना आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले हे गाडीतून जात होते. त्यावेळी त्यांनी गाडी थांबवून गाडीतून खाली उतरले व आयुब पठाण यास नाव, गाव विचारून कोणतेही कारण नसताना कानशीलात दिली. यावेळी आमदार भोसले यांच्याबरोबर असलेल्या ३० ते ३५ कार्यकर्त्यांनी मला व माझ्या सहकाऱ्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच पठाण यांचेकडे असलेल्या चारचाकी गाडीचे नुकसान केले.याप्रकरणी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले व ३० ते ३५ जणांविरुद्ध मेढा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी कुसुंबी गटातील राष्ट्रवादीच्या उमेदवार अर्चना रांजणे यांचे पती ज्ञानदेव रांजणे, राजू भोसले, यशवंत आगुंडे आदी घटनास्थळी असल्याचे फिर्यादीने सांगितले. दरम्यान, याप्रकरणी मेढ्याचे सहायक पोलिस निरीक्षक देवीदास कठाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक बी. आर. झांजुर्णे अधिक तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)खासदारांचा मध्यरात्री ठाण्यात ठिय्याआमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यावर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी रविवारी रात्री २ वाजल्यापासून सुमारे ४०० ते ५०० लोकांचा जनसमुदाय पोलिस ठाण्यात जमला होता. खासदार उदयनराजे भोसले, माजी आमदार सदाशिव सपकाळ, अमित कदम, विजय शेलार आदीजण रात्री २ ते पहाटे ६ पर्यंत मेढा पोलिस ठाण्यात ठिय्या ठोकून होते.