शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

कर्मचाऱ्याच्या आत्महत्येप्रकरणी जतच्या गटविकास अधिकाºयावर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2019 00:13 IST

जत : जत पंचायत समिती प्रशासन विभागातील कनिष्ठ सहायक दीपक सोनाजी बर्गे (वय ३८) यांनी गटविकास अधिकारी अर्चना वाघमळे ...

जत : जत पंचायत समिती प्रशासन विभागातील कनिष्ठ सहायक दीपक सोनाजी बर्गे (वय ३८) यांनी गटविकास अधिकारी अर्चना वाघमळे यांच्या त्रासाला कंटाळून राहत्या घरी आत्महत्या केल्याच्या आरोपावरून वाघमळे यांच्याविरोधात सोमवारी रात्री उशिरा जत पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाघमळे यांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. याप्रकरणी मृत दीपक यांचे वडील सोनाजी शामराव बर्गे यांनी फिर्याद दाखल केली आहे.दीपक बर्गे यांनी आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहून ठेवली होती. ही चिठ्ठी पोलिसांनी जप्त करून त्याचा पंचनामा केला होता. गटविकास अधिकारी अर्चना वाघमळे यांच्या त्रासाला व सतत होणाºया मानहानीला कंटाळून मी आत्महत्या करत आहे, असे त्यांनी चिठ्ठीत नमूद केले होते. त्यानंतर बर्गे यांच्या मृत्यूस कारणीभूत धरून त्यांच्याविरोधात जत पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात यावा व वरिष्ठांनी त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी करणारे निवेदन दीपक यांचे वडील सोनाजी शामराव बर्गे (६०, रा. आमदरी, ता. औंढा नागनाथ, जि. हिंगोली) यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत्त यांना दिले होते. पत्नी १५ मार्च रोजी नातेवाईकांच्या लग्नकार्यासाठी गावी आमदरी येथे गेल्यामुळे दीपक हे जत पंचायत समितीच्या कर्मचारी निवासस्थानातएकटे राहत होते. लोकसभा निवडणुकीसाठी नेमणूक असल्यामुळे त्यांना गावी जाता आले नव्हते. गटविकास अधिकारी अर्चना वाघमळे या दीपक यांना दैनंदिन कामात सतत त्रास देऊन अपमानास्पद वागणूक देत होत्या. त्यांचा मानसिक छळ केला जात होता. सतत होणाºया त्रासाला व अपमानास्पद वागणुकीस कंटाळून त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे पोलिसांनी केलेल्या चौकशीत निष्पन्न झाले आहे.एखादे काम केल्यानंतर ते चुकीचे झाले असेल, तर समजावून सांगण्याऐवजी जातीवाचक बोलून दीपक याचा वाघमळे यांच्याकडून अपमान केला जात होता. त्यांच्या मृत्यूस गटविकास अधिकारी अर्चना वाघमळे याच सर्वस्वी जबाबदार आहेत. दीपक माझ्या कुटुंबातील कर्ता व कमावता माणूस होता. घरात इतर कोणी कमावते नाही. त्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्यामुळे त्याची मुले, पत्नी व आमचे कुटुंब उघड्यावर पडले आहे. त्यामुळे वाघमळे यांच्याविरोधात कारवाई करून आम्हाला न्याय द्यावा, अशी मागणी सोनाजी बर्गे यांनी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली होती. त्यानुसार चौकशी करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक अनिल माने करत आहेत.