आटपाडी : राजपूत कन्स्ट्रक्शन कंपनीची वाहने फोडल्याप्रकरणी युवानेते अनिल पाटील यांच्यासह अठरा जणांविरुद्ध आटपाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता सोमनाथ महादेव म्हेत्रे यांनी शासकीय कामात अडथळा करून वाहनांचे एक लाख रुपयांचे नुकसान केल्याची फिर्याद दिली आहे.
अण्णा भाऊ साठे चौक ते ओढ्यापर्यंत काँक्रीटचा रस्ता करावा या मागणीसाठी शुक्रवारी काम बंद करून वाहनांची तोडफोड करण्यात आली. याप्रकरणी अनिल सर्जेराव पाटील, आकाश जयसिंग बनसोडे, अविनाश चव्हाण, यल्लाप्पा हनुमंत पवार, अनिरुद्ध जयसिंग देशमुख, निखिल भोसले, सुनील संजय गायकवाड, गोपी भाऊसाहेब पवार, प्रेम पांडुरंग नाईकनवरे, नरेंद्र दीक्षित, अमोल सुभाष चव्हाण, मधुसूदन शंकर लोखंडे, यश पांडुरंग नाईकनवरे, महादेव अशोक वाघमारे, तुषार दत्तात्रय लांडगे, प्रकाश रामचंद्र भिवरे, अक्षय राजेंद्र देवरे आणि संदीप युवराज मंडले (सर्व रा. आटपाडी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक भानुदास निंभोरे करीत आहेत.