शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

गुंड छोट्या बाबरसह १७ जणांविरुद्ध गुन्हा

By admin | Updated: April 28, 2017 23:53 IST

गुंड छोट्या बाबरसह १७ जणांविरुद्ध गुन्हा

सांगली : येथील शंभरफुटी रस्त्यावरील वैशाली संभाजी पाटील (वय ३२) या महिलेस दमदाटी करून तिच्या गळ्यातील दागिने लंपास केल्याप्रकरणी गुंड छोट्या बाबरसह १५ जणांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच प्रकरणात छोट्या बाबर गटातील गणेश मोरे यास मारहाण केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध, अशा एकूण १७ जणांविरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे. यातील चौघांना ताब्यात घेतले आहे.वैशाली पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, छोट्या ऊर्फ विक्रांत बाबर, गणेश मोरे, सोनू जगदाळे, रोहित बाबर, आशा जाधव, सुजाता मोरे व दहा ते पंधरा अनोळखींविरुद्ध गुन्हा नोंद आहे. गणेश मोरे याच्या फिर्यादीवरुन संभाजी मस्के-पाटील (रा. आरवडे, ता. तासगाव), वैशाली ढसाळ-बागडी (रा. शंभरफुटी) या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. श्रीधर अशोक जगदाळे, रोहित रमेश बाबर, गणेश सुरेश मोरे व सुजाता दत्ता बिरजगे (सर्व रा. सांगली) यांना रात्री उशिरा ताब्यात घेतले आहे. २३ एप्रिलला रात्री अकरा वाजता ही घटना घडली आहे, पण घटनेनंतर दोन दिवसांनी दोन्ही गटाने शहर ोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.वैशाली पाटील यांच्या फिर्यादीत म्हटले आहे की, छोट्या बाबर व त्याचे साथीदार २३ रोजी रात्री साडेअकराला पाटील यांच्या घरासमोर गेले. त्यांनी वैशाली यांना ‘तुझ्या पतीला आमच्यासमोर हजर कर, नाही तर तुला जिवंत ठेवणार नाही’, अशी धमकी दिली. त्यानंतर त्यांना धक्काबुक्की केली. त्यांच्या अंगावरील तीस हजाराचे सोन्याचे दागिने लंपास केले. तसेच घराजवळ तीन दुचाकी उभ्या होत्या. या दुचाकींवर दगडफेक करुन त्यांची मोडतोड केली. गणेश मोरे याच्या फिर्यादीत म्हटले आहे की, २३ रोजी रात्री अकराला गणेश हा वाळवेकर रुग्णालयाजवळ उभा होता. त्यावेळी पाठीमागून वैशाली ढसाळ बागडी व संभाजी मस्के-पाटील हे दोघे आले. त्यांनी पूर्वीच्या भांडणातून गणेशच्या डोक्यात बिअरची बाटली फोडून पलायन केले. (प्रतिनिधी)