शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी सक्तीच्या भूमिकेवरून साहित्यिक एकवटले; कवीने परत केला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार
2
'आप'ने पुन्हा पाडलं भाजपाच्या गडाला खिंडार; पोटनिवडणुकीतील दणदणीत विजयाची ५ कारणे काय?
3
"आधे इधर जाओ, आधे उधर जाओ, बाकी मेरे पीछे आओ" परराष्ट्र धोरणावरून काँग्रेसची सरकारवर टीका
4
अमेरिकेच्या बंकर बस्टर बॉम्बची ताकद किती? हा बॉम्ब कुणी बनवला?
5
बाजारात येणाऱ्या जाणाऱ्या महिलांना पाहून करत होता अश्लील इशारे;२० वर्षीय तरुणाला पोलिसांनी केली अटक
6
Inflation: २० वर्षांनंतर एक कोटींचं मूल्य असेल फक्त २५ लाख; महागाई कशी कमी करतेय तुमच्या पैशांचं मोल?
7
आम्ही ४ वर्षांपासून बोलत नव्हतो! संजय कपूर यांच्या निधनानंतर बहिणीची पोस्ट, म्हणाली- "जे काही घडलं ते भयानक..."
8
काळ आला होता पण..; घरगुती सिलिंडरचा भीषण स्फोट, पाहा अंगावर काटा आणणारा Video
9
'आम्हाला तिथेच लढायचेय' इराण-इस्रायल, अमेरिका युद्धात WWE का इरेला पेटला...
10
Ashadhi Ekadashi 2025: पांडुरंगाने कानात मकरकुंडले का धारण केली? मत्स्यावताराशी काही संबंध?
11
"तुम्ही विमान उडवण्याच्या लायक नाही, जा बूट...", इंडिगोच्या प्रशिक्षणार्थी पायलटचा वरिष्ठ अधिकाऱ्यांवर जातीभेदाचा आरोप; एफआयआर दाखल
12
Cluster Bomb: क्लस्टर बॉम्ब म्हणजे काय, १२३ देशांमध्ये त्यावर बंदी का?
13
गुजरातमध्ये 'आप'कडून मोदी आणि भाजपाला जबर धक्का, पोटनिवडणुकीत मिळवला दणदणीत विजय
14
ट्रम्प यांना नोबेल पुरस्कार देण्याची शिफारस आली अंगलट; पाकिस्तानी नेत्यांची पुन्हा फजिती
15
तुमचेही पैसे रिअल इस्टेटमध्ये अडकलेत का? फक्त १% लोकच कमवतायत नफा! तुम्ही 'या' चुका तर करत नाहीये ना?
16
Iran Israel War: मोठ्या संकटात अडकलाय भारत; ३.६ लाख कोटींचा आकडा का घाबरवतोय?
17
Assembly Bypoll Result 2025: पोटनिवडणुकांचे निकाल! गुजरातमध्ये एका जागेवर आप भाजपाला टक्कर देतेय; पंजाबमध्ये संजीव अरोरा आघाडीवर
18
नवीन युगाची सुरुवात! ड्रायव्हरशिवाय धावल्या गाड्या; Tesla ची Robotaxi सेवा सुरू...
19
सोनम रघुवंशीला 'वाचवणारा आणि लपवणारा' लोकेंद्र तोमर कोण? राजा हत्याकांडात आणखी एक मोठा खुलासा
20
Devendra Fadnavis: राहुल गांधींना मेक इन इंडिया माहिती नाही, त्यांनी गृहपाठ करायला हवा; फडणवीसांचा टोला!

क्रेन-दुचाकीची टक्कर; दोन ठार

By admin | Updated: June 6, 2014 00:28 IST

मृत पळशीचे : क्रेन २० फूट खड्ड्यात उलटली

खानापूर : खानापूरपासून दहा किलोमीटरवरील पळशी गावाजवळ क्रेन व दुचाकीची समोरासमोर धडक होऊन दोघेजण जागीच ठार झाले. ही घटना आज, गुरुवारी सायंकाळी चारच्या सुमारास घडली. प्रकाश गोविंद जाधव (वय ६०) व सदाशिव रामचंद्र जाधव (७८, दोघेही रा. पळशी, ता. खानापूर) अशी ठार झालेल्यांची नावे आहेत.गुहागर - विजापूर राज्यमार्गावर पळशी गावाजवळ रस्ता तीव्र वळणांचा आहे. प्रकाश जाधव व सदाशिव जाधव भिवघाटहून पळशीकडे निघाले होते. प्रकाश यांचे घर पळशी गावाबाहेर असून ते सदाशिव यांना गावात सोडण्यास निघाले होते. जुन्या बसस्थानकाच्या पूर्वेस दाट झाडी, तीव्र वळणे, उताराचा रस्ता येथे त्यांची दुचाकी (एमएच १०टी ६०८५) आली असता नागजहून भिवघाटाकडे निघालेली पवनचक्की उभी करणारी मोठी क्रेन (आरजे ०४ ईए ००९३) समोरून आली. त्यावेळी क्रेनने दुचाकीला जोरदार धडक दिली. क्रेनने या दोघांना दुचाकीसह २०० फूट फरफटत नेले. दोघांच्या अंगावरून जाऊन ती २० फूट खड्ड्यात कोसळली. या अपघातात प्रकाश जाधव यांच्या शरीराचे तीन तुकडे झाले, तर सदाशिव जाधव क्रेनखाली पूर्णपणे दबले गेले. दोघांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर क्रेनचा चालक व क्लिनरने पलायन केले. पळशी, हिवरे, भिवघाट येथील ग्रामस्थांनी घटनास्थळी गर्दी केली होती. अपघातस्थळी मृतांचे मोबाईल, चप्पल, दुचाकीचे तुकडे पडले होते. दुचाकी चक्काचूर झाली. क्रेन २० फूट खड्ड्यात पलटी झाली होती. खानापूर पोलीस औट पोस्टच्या कर्मचार्‍यांनी पंचनामा केला. शवविच्छेदनानंतर रात्री उशिरा पळशी येथे दोघांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. प्रकाश जाधव सेवानिवृत्त माध्यमिक शिक्षक होते, तर सदाशिव जाधव माजी सैनिक होते. प्रकाश जाधव यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन मुली आहेत. तर सदाशिव जाधव यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, चार मुली असा परिवार आहे. या अपघाताचे ठिकाण तीव्र वळण, उतार, दाट झाडी अशा स्वरूपाचे असल्याने समोरून येणारे वाहन एकमेकाला दिसत नाही. त्यामुळे येथे वारंवार अपघात होतात. या रस्त्याच्या दुरुस्तीची वारंवार मागणी करण्यात आली आहे. दोघांच्या मृत्यूस हाच रस्ता कारणीभूत ठरला. क्रेनच्या चालकाने रस्त्याच्या डाव्या बाजूने निघालेल्या दुचाकीला धडक दिली. चालकाचा ताबा सुटल्याने या दोघांना फरफटत नेत क्रेनही खड्ड््यात पडली. (वार्ताहर)