शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
3
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
4
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
5
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
6
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
7
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
8
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
9
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
10
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
11
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
12
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
13
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
14
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."
15
मिस्त्री, प्लंबर, फिटरपासून कनिष्ठ अभियंतापर्यंत; मिरा-भाईंदर महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती
16
आता त्या गोष्टीवर मी काहीच बोलणार नाही; सचिन-द्रविड अन् MS धोनीचं नाव घेत पुजारा म्हणाला की,..
17
आईस्क्रीम विक्रेत्याला कॉलेज प्लेसमेंटमधून १.८ कोटींचं पॅकेज? व्हायरल Video मागचं 'सत्य'
18
सासू केस ओढून मारायची, पती हुंडा घेऊन...; निक्कीच्या आईने जावयाबद्दल केला धक्कादायक खुलासा!
19
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
20
दुसरे घर घेण्याचा विचार करताय? आधी ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी तपासा, अन्यथा होईल मोठं नुकसान!

सुरक्षा रक्षक ठेक्यावरून महासभेत गदारोळ

By admin | Updated: August 21, 2014 00:27 IST

सत्ताधारी-विरोधक भिडले : करारपत्र बोगस असल्याचा आरोप : महाआघाडीच्या काळात निविदा

सांगली : महापालिकेच्या सुरक्षा रक्षक ठेक्यावरून आज, बुधवारी महासभेत गदारोळ झाला. विरोधी राष्ट्रवादीने मंजूर ठेका एकाला आणि करारपत्र मात्र दुसऱ्यासोबतच केले आहे. त्यामुळे हा ठेका रद्द करून बोगस करारपत्र करणाऱ्या अधिकाऱ्यांवरही कारवाई करावी, अशी मागणी विरोधकांनी केली. याच ठेकेदाराला प्रतापसिंह उद्यानाचे काम दिल्याचे निदर्शनास आणून देताच काँग्रेसचे नगरसेवकही आक्रमक झाले. सुरक्षा रक्षक ठेक्यावरील चर्चेला विरोध नाही, पण विषयांतर करून विरोधकांकडून दिशाभूल सुरू असल्याचा आरोप काँग्रेसने केला. यावरून गटनेते किशोर जामदार, स्थायी सभापती राजेश नाईक, विरोधी पक्षनेते दिग्विजय सूर्यवंशी व गौतम पवार यांच्यात जोरदार वाद झाला. अखेर आयुक्तांनी या ठेक्यातील अनियमिततेबद्दल चौकशी करून अहवाल देण्याचे आश्वासन दिले. महापौर कांचन कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली आज महासभा झाली. सभेत प्रश्नोत्तराच्या तासात सुरेखा बंडगर यांनी सुरक्षा रक्षक ठेक्यातील गोलमाल उघड केला. त्या म्हणाल्या की, सुरक्षा रक्षक ठेक्याची निविदा जाधव यांच्या नावावर मंजूर आहे, तर प्रशासनाने केंपवाडे या ठेकेदाराशी करार केला आहे. मूळ निविदाधारकांशी करारच झालेला नाही, असा मुद्दा मांडला. दिग्विजय सूर्यवंशी यांनी करारपत्र बोगस असून याच ठेकेदाराला प्रतापसिंह उद्यानाच्या सुशोभिकरणाचा ठेका दिल्याचे सांगितले. यावरून काँग्रेसचे किशोर जामदार, राजेश नाईक आक्रमक झाले. उद्यान व सुरक्षारक्षक हे दोन्ही विषय वेगळे आहेत. सभागृहाची दिशाभूल करू नका. सुरक्षा रक्षक पुरवठा ठेक्यावर आपले म्हणणे मांडा, असे म्हणत त्यांनी विरोधकांवर हल्ला चढविला. नगरसेवक विष्णू माने यांनी यात खुलासा करण्याचा प्रयत्न केला. पण जामदार यांच्या आक्रमक पवित्र्यामुळे त्यांनाही माघार घ्यावी लागले. त्यात गौतम पवार यांनीही याच मुद्द्याला हात घालताच, राजेश नाईक व पवार यांच्यात बाचाबाची झाली. विष्णू माने म्हणाले की, ठेकेदाराशी झालेल्या करारपत्रात दोष आहेत. त्यामुळे ठेका रद्द करून मानधनावर रक्षकाची नियुक्ती करावी, अशी मागणी केली. शेडजी मोहिते यांनी ठेक्याची मुदत संपली असून त्याला मुदतवाढ देऊ नये, अशी सूचना मांडली. गौतम पवार यांनी या विषयावर पूर्वी सभेत चर्चा झाली होती. ठेकेदारांकडून जादा घेतलेल्या दोन लाख रुपयांची वसुली झाली आहे. त्यामुळे त्याच्यावर कारवाई करून त्याचे इतर ठेकेही रद्द करावेत, अशी मागणी केली. सुरेश आवटी यांनी एकाच दिवशी ठेकेदाराला समज, वर्कआॅर्डर दिली आहे. त्यामुळे ठेक्यात गोलमाल झाला असून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी केली. अखेर आयुक्त अजिज कारचे यांनी यातील अनियमिततेबद्दल चौकशी करून महासभेकडे अहवाल सादर करण्याचे आश्वासन दिले. तसेच ठेक्याची मुदत जुलैमध्ये संपली आहे. पर्यायी व्यवस्था होईपर्यंत सुरक्षा रक्षक पुरविण्याचे काम ठेकेदाराला दिले आहे. शासनाच्या नव्या निर्देशानुसार सुरक्षा रक्षक मंडळाकडे गार्ड पुरविण्यासाठी पत्र दिल्याचा खुलासाही त्यांनी केला. (प्रतिनिधी)