शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

पद्माळेत कोरोनाग्रस्तांच्या उपचारांचा खर्च सरपंचांनी उचलला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:26 IST

संजयनगर : पद्माळे (ता. मिरज) येथील सरपंच सचिन जगदाळे सामाजिक बांधीलकी जपत स्वखर्चातून गावातील कोरोनाग्रस्त रुग्णांना उपचारासाठी लागणारी सर्व ...

संजयनगर : पद्माळे (ता. मिरज) येथील सरपंच सचिन जगदाळे सामाजिक बांधीलकी जपत स्वखर्चातून गावातील कोरोनाग्रस्त रुग्णांना उपचारासाठी लागणारी सर्व औषधे व रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी ड्रायफ्रुट, अंडी स्व:खर्चातून देत आहेत. त्यांचे हे काम प्रेरक असून, इतर सरपंचांना त्यांनी आदर्श घालून दिला आहे. त्यांच्या या उपक्रमाचे गावातून नव्हे तर जिल्ह्यातून कौतुक होत आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने जिल्ह्यात थैमान घातले आहे. याचा सर्वाधिक फटका ग्रामीण भागाला बसत आहे. अनेक कुटुंबे कोरोनाच्या विळख्यात सापडत आहेत. त्यामुळे भीतीचे वातावरण आहे. मिरज तालुक्यातील पद्माळे गावाने पहिल्या लाटेचा यशस्वी मुकाबला केला. सध्या दुसऱ्या लाटेत येथे पंधरा कोरोनाबाधित रुग्ण असून, ते होम आयसोलेशनमध्ये उपचार घेत आहेत. ग्रामीण भागातील अनेक रुग्णांची घरची परिस्थिती बेताची असते. त्यामुळे रुग्ण औषधोपचारास टाळाटाळ करते; मात्र युवा सरपंच सचिन जगदाळे यांनी गावातील प्रत्येक रुग्णावर उपचार होऊन तो बरा झाला पाहिजे. हे ध्येय समाेर ठेवून यंत्रणा राबवली आहे. सध्या गावात पंधरा रुग्ण होम आयसोलेशनमध्ये उपचार घेत आहेत. या रुग्णांना लागणारी सर्व औषधे सरपंच सचिन जगदाळे स्वत: देत आहेत. शिवाय रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी रुग्णांना आवश्यक असलेले खाद्यपदार्थ म्हणजे अंडी, काजू, बदाम, बेदाणे सरपंच जगदाळे स्वत: पुरवत आहेत. यामुळे रुग्णांना माेठा दिलासा मिळाला आहे. त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक हाेत आहे. गावातील मित्रमंडळीही त्यांच्या या कार्यात योगदान देत आहे.

चौकट

कोरोनामुक्त गावासाठी प्रयत्न

कोरोनाची दुसरी लाट धोकादायक आहे. यातून गावातील सर्व नागरिकांचा बचाव करण्याची जबाबदारी माझी आहे. सध्या गावात होम आयसोलेशनमध्ये असलेल्या रुग्णांवर वैद्यकीय अधिकारी उपचार करत आहेत; पण त्यांना लागणारी औषधे व ड्रायफ्रुट देण्याचे काम मी स्वत: करत आहे. यासाठी रुग्णांना पैसे खर्च करावे लागणार नाहीत. लवकरच गाव कोरोनामुक्त करण्याचा मानस असल्याचे सरपंच सचिन जगदाळे यांनी सांगितले.

फोटो : ११ दुपटे १

ओळी : पद्माळे (ता. मिरज) येथील सरपंच सचिन जगदाळे यांनी रुग्णांच्या नातेवाइकांकडे औषधे पाेहाेच केली.