शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत बंद जकात नाक्यांवर नगरसेवकांचा डोळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2020 11:54 IST

MuncipaltyCarporation, sangli, commissioner प्रतापसिंह उद्यान व विजयनगर येथील मोकळ्या भूखंडांच्या लिलावानंतर आता महापालिकेच्या बंद पडलेल्या जकात नाक्यांच्या जागेवर नगरसेवकांनी डोळा ठेवला आहे. त्यातील दोन जकात नाक्यांची जागा भाडेपट्टीने देण्याचा ठरावही महासभेत करण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

ठळक मुद्देसांगलीत बंद जकात नाक्यांवर नगरसेवकांचा डोळा महापालिका सभेत गुपचूप ठराव : आयुक्तांच्या भूमिकेकडे लक्ष

शीतल पाटीलसांगली : प्रतापसिंह उद्यान व विजयनगर येथील मोकळ्या भूखंडांच्या लिलावानंतर आता महापालिकेच्या बंद पडलेल्या जकात नाक्यांच्या जागेवर नगरसेवकांनी डोळा ठेवला आहे. त्यातील दोन जकात नाक्यांची जागा भाडेपट्टीने देण्याचा ठरावही महासभेत करण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

विशेष म्हणजे यावर कसलीही चर्चा सभागृहात झालेली नसताना, गुपचूप ठराव करून तो प्रशासनाकडे सुपूर्द करण्यात आला आहे. आता त्यावर आयुक्त नितीन कापडणीस काय भूमिका घेतात, याकडे लक्ष लागले आहे.महापालिकेने उत्पन्न वाढीसाठी स्वमालकीच्या जागा, भूखंड, इमारती भाडेपट्टीने देण्याचा सपाटा लावला आहे. त्यातील दोन जागांचा ई लिलाव दोन दिवसांपूर्वी काढण्यात आला. प्रतापसिंह उद्यानातील ३० मीटरची जागा आणि विजयनगर येथील मुख्य रस्त्यालगतची ५ हजार स्वेअर फुटाची जागा लिलावात काढण्यात आली. विजयनगर येथील जागेसाठी तर वार्षिक सव्वाआठ ते साडेआठ लाखाची बोली लागली आहे. जागा भाडेपट्टीने देण्यास सत्ताधारी भाजपने विरोध केला आहे. पण एकीकडे भाजपने या दोन जागांच्या लिलावाला विरोध केला असतानाच, बंद पडलेल्या जकात नाक्यांच्या जागेबाबत मात्र सोयीस्कर मौन पाळले आहे. बंद पडलेल्या जकात नाक्यांच्या जागेवर नगरसेवकांनी डोळा ठेवला आहे. त्यापैकी माधवनगर व कोल्हापूर रस्त्यावरील जकात नाक्यांची जागा भाड्याने देण्याचा ठराव महासभेत करण्यात आला आहे. वास्तविक या दोन्ही जागांबाबत सभागृहात कसलीच चर्चा झालेली नाही. तरीही ठराव करून तो अंमलबजावणीसाठी मालमत्ता विभागाकडे देण्यात आला आहे. लपूनछपून ठराव करण्यात आल्याचा आरोप होऊ लागला आहे.चौकटसग्यासोयऱ्यांची सोयजकात नाक्यांच्या मोक्याच्या जागा नगरसेवकांनी सग्यासोयऱ्यांना भाड्याने देण्याचा घाट घातला आहे. बाजारभावानुसार भाडेमूल्य आकारून जागा देण्याचा ठराव केला आहे. उत्पन्नवाढीचे गोंडस नावही त्याला दिले आहे. पण या जागांचा ई लिलाव काढला तर बाजारभावापेक्षा अधिक भाडे महापालिकेला मिळू शकते. पण महापालिकेऐवजी स्वउत्पन्नवाढीचा नवा मार्ग नगरसेवकांनी शोधला आहे.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाSatara areaसातारा परिसरcommissionerआयुक्त