शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

मनपा आयुक्तांकडून नगरसेवकांना दणका

By admin | Updated: October 4, 2016 01:00 IST

पाच कोटींच्या निविदा : फायली तपासल्यानंतरच निर्णय

सांगली : महापालिकेच्या मागासवर्गीय निधीतील पाच कोटींच्या निविदाप्रकरणी सोमवारी आयुक्त रवींद्र खेबूडकर यांनी मागासवर्गीय समितीच्या शिष्टमंडळाला चांगलेच फैलावर घेतले. या निधीतील अनेक कामे संशयास्पद असून, त्यांची छाननी झाल्यानंतरच मंजुरी देण्यात येईल, असे आयुक्तांनी स्पष्टपणे सुनावले. त्यामुळे आयुक्तांच्या दारी गेलेले नगरसेवकांचे शिष्टमंडळ आश्वासनाविनाच परत फिरले.आयुक्त खेबूडकर यांनी पदभार हाती घेतल्यापासून बेकायदेशीर कामावर वॉच ठेवला आहे. सध्या आयुक्तांकडून कामाची प्रत्येक फाईल तपासल्याशिवाय पुढे सरकत नाही. त्यातच मागासवर्गीय निधीतील पाच कोटींच्या निविदा आयुक्तांच्या टेबलावर अडकल्या आहेत. या कामांची तपासणी सुरू आहे. या निविदेतील ५० टक्के कामे बोगस असल्याचा संशय आयुक्तांना आला आहे. प्रत्यक्ष जागेवर जाऊन कामे तपासण्याचे काम सुरु आहे. त्यामुळे ही निविदा प्रक्रिया थांबली आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी मागासवर्गीय समितीचे शिष्टमंडळ आयुक्त खेबूडकर यांना भेटले. यात सभापती स्रेहल सावंत, बाळासाहेब गोंधळी, माजी महापौर कांचन कांबळे, शेठजी मोहिते, सुरेखा कांबळे, शेवंता वाघमारे आदींचा समावेश होता. मागासवर्गीय भागातील ही कामे असल्याने तातडीने मंजुरी द्यावी, अशी मागणी शिष्टमंडळाने आयुक्तांकडे केली. भागातील नागरिक ओरडत आहेत. ही कामे तातडीने सुरू करा. इस्टिमेट तयार आहेत, अभियंत्यांनीही मान्यता दिली आहे, तुमची सही राहिली आहे. या प्रस्तावांना तातडीने मान्यता द्या, अशी मागणी त्यांनी केली .यावर खेबूडकर यांनी, ५ कोटींच्या मागासवर्गीय कामाच्या सर्व फायली दहा-बारा दिवसांत तपासल्या जातील. यात ज्या फायली नियमानुसार आहेत, अशाच फायलींना मान्यता मिळेल. अनेक फायली बोगस आहेत, अनेक फायलींवर आमच्या अधिकाऱ्यांनी साध्या पेन्सिलने नकाशे काढले आहेत. याची सत्यता पडताळून पाहिली जाणार आहे. योग्य फायली असतील, त्यांनाच मान्यता दिली जाईल, असे स्पष्ट केले. (प्रतिनिधी)३८ कोटींची कामेआयुक्त खेबूडकर यांच्याकडे ३८ कोटीच्या कामांच्या फायली मंजुरीसाठी दिल्या आहेत. अनेक कामांबाबत संशयाचे वातावरण आहे. मध्यंतरी आयुक्तांनी दोन लाखाच्या कामांना ब्रेक लावला होता. या ३८ कोटींमधील बोगस कामे शोधून त्याला चाप लावण्याचे काम आयुक्तांना करावे लागणार आहे.