शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

रस्ते हस्तांतरणासाठी नगरसेवकांचे डिलिंग सुरू

By admin | Updated: July 12, 2017 00:58 IST

रस्ते हस्तांतरणासाठी नगरसेवकांचे डिलिंग सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : दारूची दुकाने सुरू करण्यासाठी राज्य व राष्ट्रीय महामार्ग हस्तांतरित करून घेण्याच्या हालचाली महापालिकेत सुरू झाल्या आहेत. त्याला मंगळवारी आणखी जोर चढला होता. पंचवीसहून अधिक नगरसेवक व पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने आयुक्तांची भेट घेऊन त्यांची भूमिका जाणून घेण्याचा प्रयत्न केला. सर्वपक्षीय नगरसेवकच रस्ते हस्तांतरासाठी सरसावले असून, पूर्वी विरोध करणाऱ्यांचा विरोधही काही प्रमाणात मावळला असल्याचे दिसते. यात मोठ्या आर्थिक घडामोडीची चर्चाही महापालिका वर्तुळात सुरू होती. सर्वोच्च न्यायालयाने राज्य व राष्ट्रीय महामार्गावर ५०० मीटर अंतरावरील दारुची दुकाने बंद करण्याचा आदेश दिला. त्यानुसार सांगली महापालिका हद्दीतील ९० टक्के दारू दुकाने बंद झाली आहेत. हे महामार्ग महापालिकेकडे हस्तांतरित झाल्यास दारुची दुकाने पुन्हा सुरू होऊ शकतात. त्यासाठी काहीजणांनी तडजोडी, वाटाघाटींच्या माध्यमातून मार्ग काढण्याचा प्रयत्न चालविला आहे. मध्यंतरी हा विषय ऐरणीवर आल्यानंतर, वाढता विरोध लक्षात घेता, महापालिकेतील कारभाऱ्यांनी माघार घेतली होती. पण गेल्या दोन दिवसांपासून रस्ते हस्तांतरणाचा विषय पुन्हा नगरसेवकांच्या अजेंड्यावर आला आहे. ज्यांचा विरोध आहे, त्यांच्याशी सुरूवातीला चर्चा करून त्यांचा विरोध कमी करण्याचा प्रयत्न झाला. त्याला बऱ्यापैकी यश आल्यानंतर, मंगळवारी नगरसेवकांच्या शिष्टमंडळाने थेट आयुक्त रवींद्र खेबूडकर यांची भूमिका जाणून घेण्याचा प्रयत्न केला. सर्वोच्च न्यायालयात दारु दुकाने सुरू करण्याबाबत एक याचिका प्रलंबित आहे. या याचिकेचा निर्णय लागण्यापूर्वी हात ओला करण्याचा नगरसेवकांचा प्रयत्न आहे. त्यात नगरसेविकाही मागे नाहीत. नगरसेविका, त्यांचे पती, पुत्र यांनीही महापालिकेत हालचाली सुरू केल्या आहेत. मंगळवारी पंचवीसहून अधिक नगरसेवकांच्या शिष्टमंडळाने आयुक्तांची भेट घेतली. महासभेने रस्ते हस्तांतरणाचा ठराव केल्यास प्रशासनाची भूमिका काय राहणार?, अशी विचारणाही आयुक्तांकडे करण्यात आल्याचे समजते. यात सत्ताधारी, विरोधक सारेच नगरसेवक सामील झाल्याने, हा विषय येत्या महासभेत एक (ज) खाली घेण्यावरही जवळपास एकमत झाल्याचे समजते. आगामी निवडणुकीच्या खर्चाचा प्रश्न काहीअंशी सुटणार असल्याने, सारेच नगरसेवक रस्ते हस्तांतरणाच्या पाठीशी राहण्याची चिन्हे आहेत. नेत्यांचा विरोध, तरीही मोह कायम!रस्ते हस्तांतरणाला सत्ताधारी काँग्रेसचे नेते आमदार पतंगराव कदम, जयश्रीताई पाटील, भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ, शिवसेनेचे संभाजी पवार, राष्ट्रवादीचे विरोधी पक्षनेते शेडजी मोहिते अशा सर्वपक्षीय नेत्यांचा विरोध आहे. शिवाय मदनभाऊ पाटील युवा मंच, शिवप्रतिष्ठान, स्वाभिमानी आघाडी, सुधार समिती अशा सामाजिक संघटनांनीही विरोध केला आहे. तरीही महापालिकेतील नगरसेवकांना हस्तांतरणाचा मोह सुटलेला नाही. त्याच रस्ते हस्तांतरणाला सर्वपक्षीय नगरसेवकांचा पाठिंबाही वाढत असल्याने कारभाऱ्यांनाही हुरूप चढला आहे.तीन कोटीचे तोडपाणीदारूची दुकाने पुन्हा सुरू करण्यासाठी रस्ते हस्तांतरणाचा पर्याय समोर आला आहे. त्यासाठी संबंधितांकडून तीन कोटी रुपयांचे तोडपाणी करण्यात आल्याची चर्चा पालिकेत सुरू आहे. प्रत्येक नगरसेवकाच्या वाट्याला तीन लाख येतील, पदाधिकाऱ्यांचा वाटा जास्तीचा, अशा पद्धतीने सूत्र निश्चित केल्याची चर्चा आहे.