शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोहर पर्रीकरांची दूरदृष्टी, सैन्याची बनली अतूट शक्ती; S-400 ‘सुदर्शन’मुळे पाक चक्रावले
2
“१५ मिनिटे सत्ता द्या, पाकिस्तानला कसे नेस्तनाबूत करायचे ते दाखवून देऊ”; AIMIM नेते आक्रमक
3
पाकिस्तानची फजिती! अर्थ व्यवहार मंत्रालयाचे अकाऊंट हॅक; 'त्या' पोस्टने वेधून घेतलं जगाचं लक्ष
4
"देशात परिस्थिती काय अन् हा बावळट...", किंग कोहलीच्या भावाने राहुल वैद्यला सुनावलं
5
हाय अलर्ट! चंदीगड-अंबालामध्ये पुन्हा वाजले सायरन, नागरिकांना घरात राहण्याच्या सूचना
6
Operation Sindoor Live Updates: भारतात घुसखोरी करणाऱ्या ७ दहशतवाद्यांना BSF जवानांनी ठार केले
7
'कराची बेकरी' पाकिस्तानी ब्रँड आहे का? कोणी केली सुरुवात? का दिलं असं नाव? हा इतिहास माहितीच हवा
8
आधारमधील तुमचा मोबाईल नंबर ऑनलाइन कसा बदलायचा? घरबसल्या २ मिनिटांत होईल काम
9
India-Pakistan War: सैन्य कारवाईवेळी घराचं नुकसान झाल्यास केंद्र सरकार किती पैसे देते?
10
कराची अन् इस्लामाबादचं कनेक्शन तुटलं; भारताच्या INS विक्रांतचा पाकिस्तानवर मोठा हल्ला
11
२३ वर्षांनी अमेरिकन पत्रकाराला मिळाला न्याय; भारतानं पाकिस्तानवर हल्ला करत घेतला बदला
12
सीमेपासून समुद्रापर्यंत... भारताचे नियोजन पाहून पाकिस्तानला भरली धडकी!
13
"शत्रूला त्याची जागा दाखवण्याची वेळ आली...", मधुगंधा कुलकर्णीची देशभक्तीवरील पोस्ट चर्चेत
14
"माझी गरज लागली तर मी बॉर्डरवर जाऊन युद्ध लढण्यासाठी तयार", प्रसिद्ध अभिनेत्याची पोस्ट चर्चेत
15
Video: ब्लॅकआऊट वेळी लाईट बंद न करणाऱ्या दुकानदारावर भडकले आजोबा; टाळक्यात हाणली काठी
16
टीव्ही अभिनेत्याचं कुटुंब जम्मूमध्ये; रात्री घाबरुन पोस्ट करत म्हणाला, "मी देशाबाहेर..."
17
मोठी बातमी! ट्रान्स-हार्बर लोकल सेवा अनिश्चित काळासाठी बंद, तुर्भेजवळ गर्डर पडण्याचा धोका असल्याने खबरदारी
18
“पाकचा खात्मा करण्यास भारतीय सैन्याला यश मिळो”; गुवाहाटीत कामाख्या देवीला साकडे, विशेष पूजा
19
Stock Market Today: मोठ्या घसरणीसह उघडल्यानंतर शेअर बाजार स्थिरावला, निफ्टीमध्येही २०० अंकांची घसरण
20
IMF Bailout Package to Pakistan : रात्रभर मिसाईल्सनं ठोकलं, आता पाकिस्तानला उपाशी मारण्याची तयारी; ११ हजार कोटींची खैरात मिळणार नाही?

जयंतरावांच्या मतदारसंघातच कोरोनाचा कहर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:18 IST

लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर : पालकमंत्री जयंत पाटील यांनी इस्लामपुरात वारंवार बैठका घेऊन कोरोनाच्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी कडक कारवाईचे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

इस्लामपूर : पालकमंत्री जयंत पाटील यांनी इस्लामपुरात वारंवार बैठका घेऊन कोरोनाच्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी कडक कारवाईचे आदेश दिले होते; परंतु प्रशासनाच्या ढिलाईमुळे वाळवा तालुक्यात कोरोना रुग्णसंख्या वाढतच चालली आहे. शासकीय कोविड केंद्रे भरली आहेत, तर खासगी रुग्णालये मनमानी करीत आहेत, त्यामुळे सर्वसामान्यांमध्ये उपचाराबाबत भय निर्माण झाले आहे.

वाळवा तालुक्यात रोज सरासरी अडीचशे ते तीनशे कोरोनाबाधित आढळून येत आहेत. यांच्यावर उपचारासाठी इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात पुरेशी शासकीय यंत्रणा नाही. त्यामुळे खासगी कोविड रुग्णालयांचा आधार घ्यावा लागत आहे. तेथे भरमसाट बिल आकारले जात असल्याने सर्वसामान्यांमध्ये उपचाराबाबत भय निर्माण झाले आहे. त्यामुळे बहुतांशी रुग्ण घरातच उपचार घेत आहेत. परिणामी रुग्णाच्या घरात आणि परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे.

आरोग्य खात्याकडून मोठ्या प्रमाणात रॅपिड ॲटिजन चाचण्या केल्या जात आहेत; परंतु कोरोनाबाधित रुग्णांवर तातडीने उपचार केले जात नाहीत. बहुतांशी रुग्ण खासगी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच उपचार घेत आहेत. कोरोनाचा संसर्ग रोखण्याचे आव्हान आरोग्य यंत्रणेपुढे आहे.

सध्या लग्नाचे मुहूर्त आहेत. लग्नकार्यात गर्दी होत आहे. लॉकडाऊन असले तरी बाजारपेठेतून सर्व साहित्य उपलब्ध होत असल्याने शहरातील रस्त्यांवर गर्दी दिसत आहे. यावर नगरपालिका, पोलीस आणि शासकीय यंत्रणेचे नियंत्रण नसल्याचे दिसून येत आहे. पालकमंत्री जयंत पाटील यांनी फक्त आढावा बैठक घ्यायची, त्यानंतर कारवाईला वाटाण्याच्या अक्षता लावायच्या, असा प्रकार सुरू आहे. यामुळे वाळवा तालुक्यातील कोरोनाचा कहर कमी होत नसल्याचे दिसत आहे.

चौकट

प्रशासकीय यंत्रणेत ढिलाई

जयंत पाटील यांच्याकडे जलसंपदा विभाग, जिल्ह्याचे पालकमंत्रीपद आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्षपद या जबाबदाऱ्या असल्याने स्वत:च्या मतदारसंघासाठी त्यांच्याकडे कमी वेळ आहे. ते येथे येऊन गेल्यानंतर प्रशासकीय यंत्रणेच्या कारभारात ढिलाई येत आहे. त्यामुळे वाळवा तालुक्यात कोरोनाचा कहर वाढत आहे.