शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
4
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
6
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
7
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
8
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
9
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
10
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
11
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
12
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
13
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
15
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
16
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
17
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
18
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
19
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
20
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात कोरोनाचा कहर; नवे २३० रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:29 IST

सांगली : जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत सोमवारी विक्रमी संख्येने वाढ झाली. गेल्या पाच महिन्यांतील सर्वाधिक रुग्णांची नोंद होताना २३० जणांना ...

सांगली : जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत सोमवारी विक्रमी संख्येने वाढ झाली. गेल्या पाच महिन्यांतील सर्वाधिक रुग्णांची नोंद होताना २३० जणांना कोरोनाचे निदान झाले. पलूस आणि वाळवा तालुक्यांतील दोघांचा मृत्यू झाला आहे. महापालिका क्षेत्रासह वाळवा, खानापूर तालुक्यात जास्त रुग्ण आढळून आले आहेत.

आठवड्यापासून जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येतील वाढ चिंता वाढविणारी ठरत आहे. साेमवारी यात चारपटीने वाढ होत २३० जणांना निदान झाले. सांगलीत ३३, मिरजेत २३, तर वाळवा आणि खानापूर तालुक्यात प्रत्येकी ३१ रुग्ण आढळून आले आहेत. १९ जण कोरोनामुक्त झाले आहेत.

आरोग्य विभागाच्यावतीने आरटीपीसीआर अंतर्गत १३९५ जणांच्या नमुन्यांची तपासणी केली. त्यात १७२ जणांना कोरोनाचे निदान झाले, तर रॅपिड ॲन्टिजेनच्या ९३७ चाचण्यांमधून ६३ जण पॉझिटिव्ह आढळले आहेत.

उपचार घेणाऱ्या ७३ जणांची प्रकृती चिंताजनक असून, त्यातील ६४ जण ऑक्सिजनवर, तर ९ जण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत. सोलापूर, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यांतील प्रत्येकी एकास, तर बेळगाव जिल्ह्यातील दोघांना कोरोनाचे निदान झाले आहे.

चौकट

उपचार घेणाऱ्यांची संख्या हजारावर

बाधितांची संख्या वाढत असतानाच उपचार घेणाऱ्यांच्या संख्येतही वाढ झाली आहे. आता १००३ जण उपचार घेत आहेत. होम आयसोलेशनमध्ये ८१३ जण असून ॲक्टिव्ह रुग्णांची संख्याही ९९४ झाली आहे.

चौकट

आतापर्यंतचे एकूण बाधित ४९,८५६

उपचार घेत असलेले १००३

कोरोनामुक्त झालेले ४७,०७८

आतापर्यंतचे एकूण मृत्यू १७७५

सोमवारी दिवसभरात

सांगली ३३

मिरज २३

वाळवा, खानापूर प्रत्येकी ३१

मिरज तालुका, जत प्रत्येकी २७

कडेगाव २१

आटपाडी १७

तासगाव ८

शिराळा, कवठेमहांकाळ प्रत्येकी ५

पलूस २