सांगली : महापालिका क्षेत्रात २१ ठिकाणी कोरोना लसीकरणाची सोय करण्यात आली आहे. गेल्या पंधरा दिवसात ७८६०० ज्येष्ठ नागरिक आणि ११७८ सहव्याधी व्यक्तींना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आल्याची माहिती आयुक्त नितीन कापडणीस यांनी दिली.
ते म्हणाले की, महापालिका क्षेत्रात १ मार्चपासून कोरोना लसीकरणाची मोहीम हाती घेण्यात आली. महापालिकेचे आरोग्य केंद्रासह २१ ठिकाणी लसीकरणाची व्यवस्था केली आहे. शहरात एकूण ७३ हजार ५५७ ज्येष्ठ नागरिक तर ३२ हजार ३५८ सहव्याधी नागरिक आहेत. ज्येष्ठ नागरिक आणि ४५ ते ५९ या वयोगटातील सहव्याधी व्यक्तींच्या लसीकरणाला सुरुवात झाली. यामध्ये गेल्या पंधरा दिवसात ७८६० ज्येष्ठ नागरिकांनी तर ११७८ सहव्याधी व्यक्तींनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली आहे. महापालिकेच्या सर्वच आरोग्य केंद्रात नोंदणीपासून ते लस देईपर्यंत सर्व सुविधा देण्यात येत आहेत. त्यामुळे कोणतीही भीती न बाळगता ज्येष्ठांनी लसीकरणासाठी पुढे यावे, असे आवाहन आयुक्त कापडणीस यांनी केले आहे.