शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
2
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
3
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
4
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
5
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
6
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का
7
नेपाळची लोकसंख्या किती? किती हिंदू? किती मुस्लीम? जाणून घ्या सर्व धर्मांसंदर्भात सविस्तर
8
१३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु
9
१० वर्षांपासून गर्लफ्रेंडला फसवत होता बॉयफ्रेंड; पाळीव कुत्र्याने 'अशी' केली पोलखोल!
10
बाप रे बाप...! एवढ्या संपत्तीचे मालक आहेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली; स्विस बँकतही आहेत कोटीच्या कोटी...!
11
लडाखच्या सियाचीनमध्ये हिमस्खलन, तीन लष्करी जवान शहीद, अनेकजण ढिगाऱ्याखाली, मदतकार्य सुरू
12
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'
13
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
14
पितृपक्ष २०२५: पितृपक्षाच्या संकष्टीला करतात साखर चौथेच्या गणपतीची स्थापना पण, विसर्जन कधी?
15
IND vs PAK : सूर्यकुमार यादवचा आक्रमक बाणा; पाकचा सलमान रिप्लाय देताना उगाच वाकड्यात शिरला (VIDEO)
16
१९९० सालचे जनआंलोदन; नेपाळच्या राजाला सोडावे लागले आपले सिंहासन, असा झाला राजेशाहीचा अंत...
17
आजची तारीख महत्त्वाची, ९९९ चा महायोग; मंगळाचे प्राबल्य, झोपण्यापूर्वी आठवणीने करा 'हे' काम
18
एक अंध तर दुसरा अपंग, तरीही मिळून तिसऱ्याला संपवलं! घटना ऐकून पोलीसही झाले स्तब्ध
19
घरात लग्नाची तयारी, होणाऱ्या पतीसोबत करायचं होतं फोटोशूट पण तरुणीसोबत घडलं आक्रित अन्...
20
बाजाराचा २ महिन्यांचा उच्चांक! गुंतवणूकदारांची १.२३ लाख कोटींची कमाई, 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर

कोरोनाची लस मुबलक, पण टोचायला सिरींजचा तुटवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:29 IST

संतोष भिसे लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : जिल्ह्यात कोरोना लसीचा पुरवठा मोठ्या प्रमाणात वाढलेला असताना आरोग्य विभागाला नव्याच समस्येचा ...

संतोष भिसे

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : जिल्ह्यात कोरोना लसीचा पुरवठा मोठ्या प्रमाणात वाढलेला असताना आरोग्य विभागाला नव्याच समस्येचा सामना करावा लागत आहे. लस टोचण्यासाठी पुरेशा प्रमाणात सिरींज मिळत नसल्याने धावाधाव करावी लागत आहे. स्थानिक पातळीवर सिरींज उपलब्ध करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे.

कोरोनाची लस टोचण्यासाठी एडी सिरींज वापरली जाते. लाभार्थ्याला लस टोचल्यानंतर निरुपयोगी ठरते. पारंपिरक लसीकरणासाठी पूर्वीपासूनच जिल्ह्यात या सिरींज वापरल्या जातात. कोरोनाचे लसीकरण सुरू झाल्यानंतर त्यांचा वापर वेगाने वाढला, त्यामुळे पुरवठ्यावर प्रतिकूल परिणाम झाला. जिल्ह्याला पुण्यातून लस व सिरींजचा पुरवठा होतो. सिरींजचे उत्पादन गुजरातमधील कंपनी करते. देशभरातून एडी सिरींजची मागणी वाढल्याने उत्पादनावर ताण पडला, परिणामी पुरवठा कमी होऊ लागला आहे.

बॉक्स

एडी सिरींज म्हणजे

एडी सिरींज म्हणजे ऑटो डिस्पोजल सिरींज होय. एकदा वापरली की निरुपयोगी ठरते. लस भरलेल्या सिरींजचे प्लास्टिकचे पिस्टन पूर्ण दाबल्यानंतर तोंडाजवळ जाऊन अडकून बसते, त्यामुळे पुन्हा वापरता येत नाही, फेकून द्यावी लागते.

बॉक्स

पारंपारीक सिरींजपेक्षा वेगळी

पारंपिरक सिरींज ऑटो डिस्पोजल करण्यासारखी नसते. एकदा टोचल्यानंतर पुन्हा वापर होऊ शकतो. पण हल्ली आरोग्यदृष्ट्या सुरक्षिततेसाठी तिचा वापर कमी झाला आहे. सर्वत्र ऑटो डिस्पोजल सिरींजच वापरल्या जातात.

बॉक्स

जिल्ह्यात दररोज २० ते ४५ हजार सिरींजचा वापर

कोरोना लसीकरणापूर्वी जिल्ह्यात वर्षाकाठी सुमारे ५५ हजार एडी सिरींजचा वापर होत असे. सध्या कोरोना लसीकरण सुरू असल्याने वर्षाचा कोटा एका दिवसातच वापरला जात आहे. दररोज सरासरी २० ते ४५ हजार लोकांना लस टोचली जात असून तितक्या सिरींज वापरल्या जात आहेत.

बॉक्स

स्थानिक स्तरावर खरेदी

एडी सिरींजअभावी लसीकरण थांबू नये यासाठी स्थानिक पातळीवर खरेदीची प्रक्रिया जिल्हा प्रशासनाने सुरू केली आहे. सुमारे दोन लाख सिरींजसाठी निविदा मागवल्या आहेत. लसीकरणासाठी उपलब्ध निधीतून सिरींजची खरेदी केली जाणार आहे. यापूर्वीदेखील काहीवेळा लसीकरण केंद्रांनी बाहेरून सिरींज विकत घेऊन वापरल्या आहेत.

कोट

सध्या साठा शिल्लक

जिल्ह्यात सध्या सिरिजचा साठा शिल्लक आहे. शासनाकडून पुरवठा कमी होऊ लागल्याने स्थानिक स्तरावरही खरेदीची तयारी केली आहे. त्यासाठी निविदाही मागवल्या आहेत. सिरींजअभावी लसीकरण खोळंबणार नाही याची दक्षता घेतली आहे.

- डॉ. विवेक पाटील, लसीकरण अधिकारी