करगणी
: कोरोनाचा संसर्ग वाढत असताना कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णाला घरातून बोलावून तब्बल तीन तास रुग्णालयाबाहेरच बसवून ठेवण्यात आले. हा प्रकार आटपाडी तालुक्यातील करगणी आरोग्य केंद्रात घडला आहे. दोषी आरोग्य अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.
करगणीतील एका रुग्णाला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्यावर आरोग्य अधिकाऱ्यांनी त्याला आरोग्य केंद्रात बोलावून घेतले. मात्र, रुग्णालयाच्या बाहेर तीन तास ताटकळतच उभे केले. यामुळे नातेवाईकानी संताप व्यक्त केला आहे. याशिवाय रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना कर्मचारी अपमानास्पद वागणूक देतात. ज्येष्ठ नागरिकांना तर खूप वाईट पद्धतीची वागणूक दिली जाते. अर्वाच्य भाषाही रुग्णांना वापरली जात असल्याच्या अनेक तक्रारी आहेत.
चाैकट
वैद्यकीय अधिकाऱ्यांचे खाजगी रुग्णालय
करगणी आरोग्य केंद्रातील आरोग्य अधिकारी त्यांचे खाजगी रुग्णालय चालवत असल्याने ते कधीतरीच दुपारी आरोग्य केंद्रात येत असतात. करगणी आरोग्य केंद्र अनेक गोष्टींबाबत चर्चेत असून, तालुका आरोग्य अधिकाऱ्यांचे कोणतेही नियंत्रण नसल्याने करगणी आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी यांचा मनमानी कारभार सुरू आहे.
कोट
रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना सन्मानाची वागणूक द्या.
करगणी परिसरातून येणाऱ्या सर्व गावांतील रुग्णांना आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून सन्मानाच्या वागणुकीची अपेक्षा आहे; अन्यथा वेगळा विचार करावा लागेल.
- उमेश पाटील, अध्यक्ष- आटपाडी तालुका ग्रामीण विकास संस्था