सांगली : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत दोन दिवसात २५ ने वाढ झाली. मंगळवारी १६ जणांना तर बुधवारी ९ जणांना कोरोनाचे निदान झाले तर दोन दिवसात ३० जण कोरोनामुक्त झाले आहेत. दोन दिवसात कोरोनाने एकही मृत्यू झाला नसल्याने दिलासा मिळाला आहे.
जिल्ह्यातील काेरोनाबाधितांची संख्या कमी होत असून बरे होणाऱ्यांचे प्रमाणही वाढत आहे.
मंगळवारी २६ जानेवारी रोजी १६ नवीन रुग्ण आढळले तर १६ जण कोरोनामुक्त झाले आहेत. मंगळवारी दिवसभरात मिरज शहरासह कडेगाव, कवठेमहांकाळ, पलूस, तासगाव, वाळवा तालुक्यात एकही बाधित आढळलेला नाही.
बुधवारी आरोग्य विभागाच्या वतीने आरटीपीसीआर अंतर्गत ३१३ जणांच्या नमुन्यांची तपासणी केली त्यात तिघांना कोरोनाचे निदान झाले आहे तर रॅपिड ॲन्टिजेनच्या १०९३ चाचण्यांमधून ७ जण बाधित आढळले आहेत.
जिल्ह्यातील पाच रुग्णालयात १२४ जण उपचार घेत असून त्यातील ४० जणांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यातील ३७ जण ऑक्सिजनवर तर ३ जण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत.
चौकट
आतापर्यंतचे एकूण बाधित ४८०४६
उपचार घेत असलेले १२४
कोरोनामुक्त झालेले ४६१७४
आतापर्यंतचे एकूण मृत्यू १७४८
बुधवारी दिवसभरात
सांगली १
मिरज ०
आटपाडी ०
जत २
कडेगाव ०
कवठेमहांकाळ ०
खानापूर ३
मिरज तालुका १
पलूस ०
शिराळा १
तासगाव १
वाळवा ०