सांगली : जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी नवीन कोरोना रुग्णसंख्या दोनशेच्या खाली नोंदली गेल्याने दिलासा मिळाला. सोमवारी दिवसभरात १७८ नवीन रुग्ण आढळून आले, तर एकाचा मृत्यू झाला. २९० जण कोरोनामुक्त झाले आहेत. म्युकरमायकोसिसचा एक नवीन रुग्ण आढळला.
रविवारी रुग्णसंख्या कमी झाल्याने दिलासा मिळाला होता. सोमवारीही हीच संख्या कायम राहिली. जिल्ह्यात कवठेमहांकाळ तालुक्यातील एकाचा मृत्यू झाला. महापालिका क्षेत्रातील रुग्णसंख्या घटली असून सोमवारी एकही कोरोनाने मृत्यूची नोंद झाली नाही.
आरोग्य विभागाने आरटीपीसीआर अंतर्गत २२७१ जणांच्या नमुन्यांची तपासणी केली त्यात ८३ जण बाधित आढळले, तर रॅपिड ॲन्टिजनच्या ४०२४ जणांच्या नमुने तपासणीतून ९७ जणांना कोरोनाचे निदान झाले.
उपचार घेत असलेल्या १६५२ जणांपैकी ४८६ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील ३८७ जण ऑक्सिजनवर तर ९९ जण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत. परजिल्ह्यातील दोघे उपचारासाठी जिल्ह्यात दाखल झाले.
चौकट
आतापर्यंतचे एकूण बाधित १९५९४८
उपचार घेत असलेले १६५२
कोरोनामुक्त झालेले १८९१३९
आतापर्यंतचे एकूण मृत्यू ५१५७
सोमवारी दिवसभरात
सांगली १३
मिरज ५
आटपाडी २०
कडेगाव २३
खानापूर ३६
पलूस ७
तासगाव २०
जत १६
कवठेमहांकाळ ११
मिरज तालुका १६
वाळवा ११
चौकट
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सोमवारी प्रथमच शिराळा तालुक्यात एकाही नव्या रुग्णाची नोंद झाली नाही.