सांगली : जिल्ह्यातील वाढत्या कोराेनाबाधितांच्या संख्येला शुक्रवारी काही प्रमाणात ब्रेक लागला. दिवसभरात १२८० जणांना कोरोनाचे निदान होतानाच परजिल्ह्यांतील १२ जणांसह जिल्ह्यातील २४ अशा ३६ जणांचा मृत्यू झाला असून, १०२६ जणांनी यशस्वीपणे कोरोनावर मात केल्याने दिलासा मिळाला आहे.
बाधितांची वाढती संख्या चिंता वाढवीत असताना शुक्रवारी बाधितांसह मृत्युसंख्येतही घट झाली आहे. जिल्ह्यात २४ जणांचा मृत्यू झाला आहे. यात सांगली ३, मिरज ४ यांसह वाळवा, तासगाव तालुक्यांत प्रत्येकी ५, कवठेमहांकाळ, मिरज तालुक्यात प्रत्येकी दोन, तर आटपाडी, कडेगाव, पलूस तालुक्यात प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे.
उपचार घेत असलेल्या १३ हजार १४८ रुग्णांपैकी २२०९ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यापैकी १९९४ जण ऑक्सिजनवर, तर २१५ जण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत.
परजिल्ह्यातील १२ जणांचा मृत्यू झाला असून, १०५ नवीन रुग्ण उपचारासाठी जिल्ह्यात दाखल झाले आहेत.
चौकट-
आतापर्यंतचे एकूण बाधित ७५६७८
उपचार घेत असलेले १३१४८
कोरोनामुक्त झालेले ६०२६४
आतापर्यंतचे एकूण मृत्यू २२६६
शुक्रवारी दिवसभरात
सांगली १३२
मिरज ७१
जत २२५
वाळवा २०२
आटपाडी १६०
मिरज तालुका १४२
तासगाव ११६
खानापूर १००
कवठेमहांकाळ ६०
कडेगाव २७
शिराळा २६
पलूस १९
चाैकट
६० हजारांवर कोरोनामुक्त
जिल्ह्यातील बाधितांची संख्या वाढत असली तरीही आता बरे होणाऱ्यांचेही प्रमाण वाढत आहे. शुक्रवारी जिल्ह्यात बरे होणाऱ्यांच्या संख्येने ६० हजारांचा टप्पा पूर्ण केल्याने दिलासा मिळाला आहे.