वाळवा तालुक्यातील कामेरी व येडेनिपाणी येथे शासनाच्या कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतावरील व शेतकरी उत्पादक कंपनीच्या उपक्रमांची माेते यांनी पाहणी केली. यावेेेळी येडेनिपाणी येथील धनाजी गणपती साळुंखे-शिरटेकर व संतोष गणपती साळुंखे-शिरटेकर या शेतकऱ्यांच्या शेतातील महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेेतून बांधावर लावलेेल्या आंबा फळबाग लागवडीची पाहणी केली. कामेरी येथील प्रवीराम रोपवाटिकेची पाहाणी करून माेते यांनी समाधान व्यक्त केले. कार्यक्रमास उपविभागीय कृषी अधिकारी हणमंत इंगवले, तालुका कृषी अधिकारी भगवान माने, पंचायत समिती सदस्य आनंदराव पाटील, सी. एच. पाटील, सरपंच डॉ. सचिन पाटील, अमर पाटील, राकेश कदम, प्रकाश कदम, प्रवीण पाटील, सचिन यादव, स्वप्निल पाटील, डी. आर. जाधव, जयकुमार माळी, विवेक ननावरे, डी. व्ही. पाटील उपस्थित होते. सरपंच डॉक्टर सचिन पाटील यांनी स्वागत केले. प्रवीण पाटील यांनी आभार मानले.
फोटो : ०९ कामेरी १
ओळी : कामेरी (ता. वाळवा) येथे फलोत्पादन संचालक डॉ. कैलास मोते, तालुका कृषी अधिकारी भगवान पाटील यांनी कृषी उपक्रमांची पाहणी केली.