लोकमत न्यूज नेटवर्क
शिरढोण : ‘जॉली बोर्ड’ने नेहमीच सामाजिक उपक्रमात आपले वेगळेपण निर्माण केले आहे. कोरोना कालावधीतही जॉली बोर्ड कंपनीने प्रशासनाला सहकार्य केले आहे, असे प्रतिपादन तहसीलदार बी. जे. गोरे यांनी केले. देशिंग (ता. कवठेमहांकाळ) येथील जॉली बोर्ड कंपनीतर्फे सामाजिक बांधिलकी कार्यक्रमांतर्गत दोनदिवसीय मोफत कोरोना लसीकरण झाले. तहसीलदार बी. जे. गोरे यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन झाले, यावेळी ते बोलत होते. नगर पंचायतीचे मुख्याधिकारी डॉ. संतोष मोरे यावेळी उपस्थित होते.
कंपनीच्या आसपासच्या गावांतील शंभरहून अधिक ग्रामस्थांनी या लसीकरणाचा लाभ घेतला. आदित्य हॉस्पिटल, सांगली यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी जनरल मॅनेजर एस. आर. पाटील, फॅक्टरी मॅनेजर गणेश शिंदे, अकाऊंट्स मॅनेजर प्राणेश पवार, शीतल माळी उपस्थित होते.
180821\img-20210818-wa0015.jpg
जॉली बोर्ड बातमी फोटो