शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
2
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
3
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
4
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
5
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
6
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
7
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
8
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
9
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
10
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
11
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
12
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला
13
IND vs ENG : क्रिस वोक्सला सलाम! खांदा फॅक्चर असताना संघासाठी मैदानात उतरला (VIDEO)
14
शाहरुख खान अन् राणी मुखर्जीसाठी प्रिय मित्र करण जोहरची पोस्ट, म्हणाला, "३३ वर्षांचा हा काळ..."
15
थ्रेडिंगमुळे लिव्हर फेल? आयब्रो करणं पडेल चांगलंच महागात, डॉक्टरांचा धोक्याचा इशारा
16
१७,००० कोटींचा घोटाळा! अनिल अंबानींच्या डोकेदुखीत वाढ, ED आता 'या' लोकांची चौकशी करणार
17
Post Office ची ५० वर्ष जुनी सेवा होणार बंद, तुमच्यावर काय परिणाम होणार?
18
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
19
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?

जिल्ह्यातील १६८0 कर्जदारांवर जप्ती!

By admin | Updated: February 9, 2016 00:17 IST

जिल्हा मध्यवर्ती बँक : वसुलीसाठी कायदेशीर कारवाईच्या हालचाली सुरू

सांगली : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या थकित कर्जदारांपैकी पहिल्या टप्प्यात १६८0 कर्जदारांवर कायदेशीर कारवाईच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. या कर्जदारांकडे एकूण ९ कोटी ५२ लाख रुपये कर्ज थकित आहे. कर्ज वसुली प्रमाणपत्र मिळताच जप्तीची कारवाई करण्यात येणार आहे. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६0 मधील कलम १0१ नुसार कारवाई करण्यात येत आहेत. जिल्ह्यातील जवळपास पन्नास हजार कर्जदारांकडे २३८ कोटीचे कर्ज थकित आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यात १६८0 कर्जदारांवर कारवाईच्या हालचाली सुरू आहेत. या कर्जदारांवर जप्तीची व तत्सम कारवाई करता यावी म्हणून कर्ज वसुली प्रमाणपत्र मिळविण्यात येत आहेत. त्यानंतर कारवाईचे अधिकार संबंधित तालुक्यातील वसुली अधिकाऱ्यांना प्रदान करण्यात येणार आहेत. त्यानंतर सुरुवातीला जप्तीपूर्वच्या व नंतर जप्तीच्या नोटिसा देऊन प्रत्यक्ष जप्तीची कारवाई केली जाणार आहे. द्राक्षे, डाळिंब, ऊस आदी पिकांसाठी प्रामुख्याने अल्पमुदत पीक कर्ज घेतलेल्या कर्जदारांचा थकबाकीदारांमध्ये समावेश आहे. २00९ पासून कर्ज थकित असल्याने आता ही कारवाई केली जाणार आहे. एकीकडे कारवाईच्या हालचाली सुरू असताना, जिल्ह्यातील सर्वच कर्जदारांना बँकेने पैसे भरण्याचे आवाहन केले आहे. वेळेत कर्ज परतफेड केल्यानंतर व्याजदरात सवलत मिळून संबंधित कर्जदारांचाच फायदा होणार आहे. त्यामुळे कर्जदारांनी व्याज सवलत योजनेचा लाभ घ्यावा आणि होणारी कारवाई टाळावी, असे आवाहन जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अधिकाऱ्यांनी केले आहे. (प्रतिनिधी)तालुका सभासदथकबाकीशिराळा ९५९ ३,0१,00,000वाळवा३,७१६१३,४६,६९,000 मिरज ३,८८0१७,६८,११,000कवठेमहांकाळ ३९४३१२,६३,४१,000जत १२,0६२६८,४९,३२,000तासगाव ४१0८२४,६७,00,000खानापूर ८६६२,९९,00,000आटपाडी १८५८६,0४,00,000पलूस१५७८७,९१,00,000कडेगाव८७२३,७२,१३,000कारवाई होणारे कर्जदारतालुका सभासदथकबाकीशिराळा ४६१२,३७,000कवठेमहांकाळ ८१५ ३,६0,0८,000जत ६९४५,२७,0६,000आटपाडी १३५५३,३१,000