आ.विक्रम सावंत यांच्या हस्ते जत ग्रामीण रुग्णालयात ३१ जम्बो सिलिंडर क्षमतेचे ऑक्सिजन प्लांटचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. आ.सावंत म्हणाले की, पहिल्या व दुसऱ्या लाटेत तालुक्यात ऑक्सिजन बेड न मिळाल्यामुळे काही रुग्णांची गैरसोय झाली होती. तालुक्यात ऑक्सिजन प्लांटची व्यवस्था नसल्याने रुग्णांना तालुक्यापासून शंभर किलोमीटरवर जावे लागत होते. तालुक्यात कोरोना रुग्णालये, ऑक्सिजन प्लांटची व्यवस्था झाल्यामुळे तिसरी लाट आलीच, तर ताकतीने कोरोनाचा सामना करणे शक्य झाले आहे.
यावेळी माजी सभापती बाबासाहेब कोडग, जिल्हा परिषद सदस्य सरदार पाटील, उपविभागीय अधिकारी प्रशांत आवटे, पोलीस उपाधीक्षक रत्नाकर नवले, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.संजय बंडगर, डॉ.इरकर, माजी सरपंच मारुती पवार, माजी नगरसेवक नीलेश बामणे, माजी उपसरपंच दिलीप सोलापुरे सावकार, आकाश बनसोडे, युवक नेते राजू यादव, आप्पू माळी आदी उपस्थित होते.
140921\screenshot_2021-09-14-15-42-41-83.png
जत ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन प्लांटचे उदघाटनI