दीक्षित गेडाम म्हणाले, कोरोनाच्या नियमांचे पालन न करणाऱ्यांची गय करू नका. जे होम आयसोलेशन आहेत त्यांना बाहेर फिरू देऊ नका.
एक तारखेपासून लसीकरणाची मोहीम सुरू होणार आहे. तेथे पोलिसांची अतिरिक्त कुमक तैनात करा. ज्यांचे लसीकरण आहे, त्यांची आदल्या दिवशी नोंदणी करून घ्यावी, कोणीही नियमांचे उल्लंघन केले तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करा. त्या क्षेत्राच्या १०० मीटर क्षेत्र बंदिस्त करावे, अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या.
पलूस तालुक्यातील सर्व प्रशासनाच्या कामाबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांची अंमलबजावणी योग्यरीत्या होत असल्याने नागरिकांवर कायद्याचा वचक निर्माण झाला आहे. त्यामुळे यापुढेही अशीच यंत्रणा राबवण्याचा सल्ला त्यांनी दिला.
यावेळी प्रांताधिकारी गणेश मरकड, तहसीलदार निवास ढाने, विभागी पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे, भिलवडीचे सहायक पोलीस निरीक्षक कैलास कोडग, पलूसचे सहायक पोलीस निरीक्षक विकास जाधव, कुंडलच्या सहायक पोलीस निरीक्षक संगीता माने, डॉ. रागिणी पवार, नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुमित जाधव, डॉ. अधिक पाटील आदी उपस्थित होते.