शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
5
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
6
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
7
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
8
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
9
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
10
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
11
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
13
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
14
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
15
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
16
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
17
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
18
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
19
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
20
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार

‘वसंतदादा’च्या कामगारांचा दत्त इंडियाशी करार

By admin | Updated: June 30, 2017 23:13 IST

‘वसंतदादा’च्या कामगारांचा दत्त इंडियाशी करार

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : वसंतदादा साखर कारखान्याच्या कामगारांना तात्काळ ३० टक्के पगार देण्याचा निर्णय दत्त इंडिया कंपनीने घेतला. उर्वरित थकित पगार पाच टप्प्यात १४ टक्क्यांप्रमाणे दिला जाईल. त्याबाबतचा करार कारखाना चालवण्यास घेतलेल्या दत्त इंडिया कंपनीने कामगार संघटनेशी शुक्रवारी केला. कंपनीने कामगार हिताचा विचार करीत रोजी-रोटी वाचवली आहे. कामगारांबाबत ऐतिहासिक करार झाल्याची माहिती साखर कामगार संघटनेचे जनरल सचिव प्रदीप शिंदे यांनी दिली. वसंतदादा कारखान्याच्या कामगारांचा दत्त इंडिया कंपनीशी करार अखेर पूर्ण झाला. कंपनीचे संचालक धारू, सरव्यवस्थापक मृत्युंजय शिंदे, सचिव मोरे, कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील, उपाध्यक्ष अमित पाटील, कामगार संघटनेचे अध्यक्ष विलास पाटील, उपाध्यक्ष अशोक साळुंखे, महाराष्ट्र राज्य प्रतिनिधी मंडळाचे राऊ पाटील, तात्यासाहेब काळे, शंकरराव भोसले यांच्या उपस्थितीत करार करण्यात आला. जिल्हा बँकेने ९३ कोटी रुपयांच्या थकीत कर्जासाठी सिक्युरिटायझेशन अ‍ॅक्टखाली वसंतदादा साखर कारखाना ताब्यात घेतला होता. त्यानंतर हा कारखाना भाडेतत्त्वाने चालविण्यास देण्याकरिता निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. कारखाना मुंबईच्या दत्त इंडिया या कंपनीला भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय जिल्हा बँकेने घेतला आहे. प्रतिटनास २६१ रुपये उच्चांकी दराने त्यांनी हा कारखाना घेतला आहे. निर्णय झाल्यानंतर जिल्हा बॅँकेचे प्राधिकृत अधिकारी मानसिंग पाटील यांनी करारपत्रक करण्यापूर्वी कारखाना सभासदांचा ठराव लागणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यानुसार कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील यांनी विशेष सभा घेऊन ठरावही दाखल केला आहे. करारपत्रात कामगार, शेतकरी, सभासद व अन्य देणी तसेच कामगारांशी करायच्या कराराचाही उल्लेख बँकेने केला आहे. त्यामुळे कंपनी प्रतिनिधींनी गुरुवारपासून तातडीची बैठक घेऊन कामगार युनियनला चर्चेसाठी बोलावले होते. दत्त इंडियाने कामगारांशीही चर्चा करून स्वतंत्र करारावर शिक्कामोर्तब केले.कारखान्यातील कामगारांना तात्काळ ३० टक्के पगार देण्याचा निर्णय कंपनीने घेतला. उर्वरित थकित पगार पाच टप्प्यात १४ टक्क्यांप्रमाणे दिला जाईल. त्याबाबतचा करार कंपनीने कामगार संघटनेशी केला. सेवानिवृत्त झालेल्या कामगारांचे पैसे टप्प्याटप्प्याने दिले जाणार आहेत. भविष्य निर्वाह निधीचे १४ कोटी भरायचे आहेत. ही रक्कम व्याजासह ३४ कोटींवर गेली आहे. मार्चपर्यंत मुदलाची रक्कम भरण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली. कंपनीने गुरुवारी दिवसभर कामगारांशी कराराबाबत चर्चा केली. रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या चर्चेतून निर्णय झाला नाही. शुक्रवारी कराराबाबत पुन्हा चर्चा सुरू झाली. गेल्या अनेक दिवसांपासून कामगारांनी बैठका घेऊन युनियनच्या माध्यमातून कंपनी व कारखान्याला नियम पाळण्याबाबत इशारा दिला होता. त्यानुसार कंपनीने कामगारांशी स्वतंत्रपणे चर्चा केली. अनेक मुद्द्यांवर वादही झाला. भविष्य निर्वाह निधी रक्कम, तसेच कामगारांच्या थकीत फंडाच्या रकमेवरूनही वाद आहे. फंडाची रक्कम केवळ मुद्दल भरायची की व्याजासह, यावर बराच वेळ वाद झाला. ही बाब न्यायप्रविष्ट आहे. तूर्त मार्चअखेर फंडाची सर्व रक्कम भरण्याचा निर्णय झाला. व्याजाबाबत चर्चा करू, व्याजात सवलत मिळते का, यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. कंपनीच्या प्रस्तावावर कामगार युनियनने समाधान व्यक्त केले आहे.या बैठकीस चंद्रकांत सावंत, सर्जेराव भोसले, शिवाजी पाटील, पोपट पाटील, सुनील घोरपडे, संजय पवार, रामभाऊ पाटील, अरुण संकपाळ, राजू मुलाणी, श्रीकांत पाटील उपस्थित होते. ७३४ कामगार वसंतदादा साखर कारखान्याकडे आहेत. यापैकी ६०० कामगारांनाच घेण्यास दत्त इंडियाने करारामध्ये मंजुरी दिली आहे.या कामगारांच्या पगाराचाही प्रश्न निर्माण होणार आहे. परंतु, कंपनीच्या माहितीनुसार जिल्हा बँकेला भाड्याद्वारे मिळणाऱ्या रकमेतून कारखान्याने १३४ कामगारांचा पगार भागवावा, असे ठरले.दत्त इंडियाशी असा झाला करारनऊ महिन्यांच्या थकित पगारापैकी तात्काळ ३० टक्के रक्कम देण्यास कंपनी तयारउर्वरित पगार १४ टक्क्याने पाच टप्प्यातसेवानिवृत्त कामगारांचे पैसे टप्प्याटप्प्याने देण्याचे मान्यभविष्य निर्वाह निधीचे १४ कोटी भरणारग्रॅच्युईटीबाबत सकारात्मक चर्चा कारखान्यातील कामगारांना सरासरी दोन ते सव्वादोन लाख रुपये मिळणार