कुपवाड : वतन व इनाम जमिनी नियमितीकरणासाठी बाजारभावाच्या २५ टक्के रक्कम भरण्याची सवलत जाहीर केली आहे. शासनाने त्याला मुदतवाढ देऊन दिलासा दिला आहे. गुंठेवारीधारकांनी एजंटामार्फत प्रस्ताव दाखल न करता जनता दलाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जनार्दन गोंधळी व ॲड. फय्याज झारी यांनी केले आहे.
सांगली-मिरज आणि कुपवाड महापालिकेकडे गुंठेवारीधारकांनी विकास शुल्क भरून नियमितीकरणाचे प्रस्ताव दाखल केलेले आहेत.
त्या प्रस्तावास महापालिकेने त्वरित मान्यता द्यावी. नव्यानेही गुंठेवारीतील नागरिकांचे नियमितीकरणाचे प्रस्ताव दाखल करून घ्यावेत. त्यामुळे गुंठेवारीधारकांनी एजंटामार्फत प्रस्ताव दाखल न करता सांगली-मिरज आणि कुपवाड येथील जनता दलाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा. नियमितीकरणाचे प्रस्ताव दाखल करण्यासाठी गुंठेवारीधारकांना जनता दलाकडून सर्व प्रकारची मदत करण्यात येईल, असे आवाहन गोंधळी व झारी यांनी केले आहे.