शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

महाजनादेश यात्रेकरिता महावितरणचे ग्राहक वेठीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2019 00:04 IST

सांगली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपची महाजनादेश यात्रा राज्यभर सुरू असून, तिचे आगमन सोमवारी सांगलीत झाले. वाहनांच्या ...

सांगली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपची महाजनादेश यात्रा राज्यभर सुरू असून, तिचे आगमन सोमवारी सांगलीत झाले. वाहनांच्या ताफ्यातील रथाच्या उंचीमुळे अडथळा नको म्हणून महावितरण कंपनीने रस्त्यावरील विद्युत तारा तोडल्यामुळे पलूस तालुक्यातील बांबवडे, येळावीतील नागरिकांना अंधारात रहावे लागले. सांगली शहरातही काही भागात सोमवारी रात्री नऊपर्यंत वीजपुरवठा सुरळीत झाला नव्हता. लोकांना वेठीस धरल्याने संतप्त प्रतिक्रिया आहेत. अनेक झाडांची कत्तलही करण्यात आली.सांगलीत मुख्यमंत्री फडणवीस यांच्या यात्रेतील वाहनाला अडथळा नको म्हणून सुरक्षेसाठी विजेच्या तारा तोडल्याने त्याचा बोजा ग्राहकांवर बसणार आहे. मात्र वीज जोडणीचा फारसा खर्च नसल्याचा दावा महावितरणचे अधिकारी करीत आहेत. प्रत्यक्षात पलूस ते पाचवा मैल या रस्त्यावरील बारा ते तेरा ठिकाणच्या तारा तोडल्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेचे अनेक कुटुंबांना अंधारातच स्वागत करावे लागले. उंच वाहनांना अडथळा नको म्हणून अनेक ठिकाणच्या विद्युत तारा तोडून त्याचा लाखो रुपयांचा खर्च ग्राहकांवर का?, असा सवाल उपस्थित होत आहे.पलूस तालुक्यातील बांबवडे आणि तासगाव तालुक्यातील येळावी गावातील अनेक कुटुंबीयांच्या घरात दोन दिवस अंधार होता. राज्य सरकारने रॉकेल देणेही बंद केल्यामुळे तेथील कुटुंबीयांचे प्रचंड हाल झाले. याला जबाबदार कोण, असा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष महावीर पाटील यांनी उपस्थित केला आहे. ग्रामीण भागाबरोबरच मिरज ते सांगली, आंबेडकर रस्ता ते कोल्हापूर रस्त्यावरील अनेक ठिकाणच्या विद्युत तारा तोडाव्या लागल्या आहेत. महाजनादेश यात्रा गेल्यानंतरही अनेक ठिकाणचा वीजपुरवठा सुरळीत झाला नसल्यामुळे ग्राहकांनी संताप व्यक्त केला.महाजनादेश यात्रेमुळे जनता अंधारात : संतोष पाटीलमुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेसाठी सांगली-मिरजेतील वृक्षांची कत्तल करण्यात आली. त्याचबरोबर यात्रेच्या मार्गावरील विद्युतपुरवठाही खंडित करण्यात आला. यात्रा संपल्यानंतरही रात्री उशिरापर्यंत कॉलेज कॉर्नर, उत्तर शिवाजीनगर, काँग्रेस कमिटी, पुष्पराज चौक, कोल्हापूर रोड परिसर अंधारात होता. महाजनादेश यात्रेमुळे जनतेत आनंदाचे वातावरण अपेक्षित होते. पण या यात्रेने सांगलीकरांना अंधारात ढकलल्याची टीका मदनभाऊ युवा मंचचे जिल्हाध्यक्ष नगरसेवक संतोष पाटील यांनी केली.