शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

बांधकाम कामगारांचा सांगलीमध्ये मोर्चा

By admin | Updated: October 31, 2014 23:51 IST

विविध मागण्या : न्यायालयात दाद मागणार

सांगली : बांधकाम कामगारांच्या विविध मागण्यांसाठी आज (शुक्रवार) जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. आंदोलनाचे नेतृत्व कामगार नेते शंकर पुजारी यांनी केले. बांधकाम कामगारांच्या मुलांच्या शिष्यवृत्तीचे अर्ज प्रलंबित असून, ते निकाली काढण्यात यावेत, मृत्यू पावलेल्या कामगारांच्या वारसांना नुकसान भरपाई मिळावी, घर बांधणीसाठी दोन ते पाच लाखापर्यंतचे बिनव्याजी कर्ज मिळावे, घर बांधणीसाठी अल्पदराने जमिनी मिळाव्यात, ६० वर्षानंतर दरमहा तीन हजार रुपये पेन्शन देण्यात यावी, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार बांधकाम कामगारांना अंत्योदय रेशन कार्डे मिळावीत, दोन रुपये दराने ३५ किलो धान्य मिळावे आदी मागण्यांसाठी आजचा मोर्चा काढण्यात आला होता. या मागण्या कायदेशीर असून याबाबत वेळोवेळी सर्वोच्च न्यायालयाने सूचनाही केल्या आहेत. या मागण्या मान्य केल्या नाहीत तर सर्वोच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल करण्याचाही इशारा यावेळी देण्यात आला. मोर्चाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून करण्यात आली. मोर्चा शिवाजी मंडई, महापालिका, राजवाडा चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आला. आंदोलनामध्ये सुमन पुजारी, विजय बचाटे, वर्षा गडचे, कमल तांदळे, बाळू दिवाणजी, आनंद तांदळे, अर्जुन पखाली, बाळासाहेब कोल्हे आदी सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)